JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / चप्पलचं भांडण थेट रक्तरंजित वादात बदललं! जोडप्याचं शेजाऱ्यासोबत भयानक कांड, पत्नीला अटक, पती फरार...

चप्पलचं भांडण थेट रक्तरंजित वादात बदललं! जोडप्याचं शेजाऱ्यासोबत भयानक कांड, पत्नीला अटक, पती फरार...

Thane Crime News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्याची हत्या केली.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 5 मार्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती-पत्नीने किरकोळ वादातून शेजाऱ्याची हत्या केली. शेजाऱ्याने आरोपी दाम्पत्याच्या घराच्या दारात चप्पल काढली होती. यानंतर पती-पत्नी आणि शेजारी यांच्यात वादावादी झाली, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, तर पती फरार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, नया नगर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जिलानी सय्यद यांनी सांगितले की, दाम्पत्य आणि पीडित अनेकदा एकमेकांवर चप्पल दरवाजाजवळ ठेवल्याचा आरोप करत भांडत असत. यावरून शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला, त्याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. यानंतर ज्याची भीती वाटत होती, तेच घडलं. रागाच्या भरात आरोपींनी शेजाऱ्याला मारहाण केली. वाचा - साखरपुडा झाला नाही म्हणून दिरांनी वहिनीवरच केले कुऱ्हाडीनं सपासप वार चप्पलवरून अनेकदा भांडण भांडणानंतर 34 वर्षीय जखमी अधिकारी खत्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या भांडणात गंभीर जखमी झाल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. स्टेशन इन्स्पेक्टर जिलानी सय्यद यांनी या घटनेची अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वादात अधिकारी खत्री यांना गंभीर दुखापत झाली होती. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपीच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. मात्र, पतीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, चप्पल ठेवण्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची बारकाईने चौकशी करण्यात येईल, असेही पोलीस अधिकारी म्हणाले. काही दिवसांपूर्वी ठाण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली होती. जिथे एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. यानंतर शेजारच्या मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या