जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / साखरपुडा झाला नाही म्हणून दिरांनी वहिनीवरच केले कुऱ्हाडीनं सपासप वार, शेजारी वाचवायला आला आणि...

साखरपुडा झाला नाही म्हणून दिरांनी वहिनीवरच केले कुऱ्हाडीनं सपासप वार, शेजारी वाचवायला आला आणि...

गावात दोन दिरांनी त्यांची वहिनी आणि शेजारच्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार मारलं

गावात दोन दिरांनी त्यांची वहिनी आणि शेजारच्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार मारलं

गावात दोन दिरांनी त्यांची वहिनी आणि शेजारच्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार मारलं

  • -MIN READ Trending Desk Rajsamand,Rajasthan
  • Last Updated :

    राजस्थान, 04 मार्च :  राज्यस्थानमधील जालौर जिल्ह्यातील मोदरान गावात एक धक्कादायक प्रकार घडला. दोन दिरांनी कुऱ्हाडीनं वार करून त्यांच्या वहिनीची आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या शेजारच्या व्यक्तीची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डुंगरसिंह आणि पहाडसिंह यांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रा रतनसिंह कवर (वय 45) व हरिसिंह असं मृत झालेल्यांची नावं आहेत. तर, मयत इंद्रा कवर हिचा 12 वर्षांचा मुलगा या घटनेत गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   मोदरान गावात पोलीस स्टेशनपासून फक्त 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. गुन्हा केल्यावर एका आरोपीनं कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलंय. घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त तैनात या घटनेची माहिती मिळाल्यावर, पोलीस अधीक्षक डॉ. किरण कंग सिद्धु, पोलीस अधिकारी सीमा गुप्ता, रामसीनचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार राजपुरोहित यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतदेह रामसीन सरकारी रुग्णालयाच्या शवगृहात पाठवले. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. सिद्धू यांनी सांगितलं की, ‘मोदरान गावात दोन दिरांनी त्यांची वहिनी आणि शेजारच्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार मारलं आहे, अशी पोलिसांना माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच मी स्वत: घटनास्थळाला भेट दिली. प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण कौटुंबिक कलहातून झाल्याचं समोर आलं आहे. मृत महिलेचा मुलगाही जखमी झालाय. घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.’ नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतनसिंहची पत्नी इंद्रा कवर ही तिची मुलगी आणि मुलासह घरी होती. त्याचवेळी तिचा दीर आरोपी डुंगरसिंह आणि पहाडसिंह हा तिथे आला आणि त्यांनी कौटुंबिक कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी इंद्रा कवर यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केला. त्याचवेळी कवर याच्या घराशेजारी राहणारा हरिसिंह हा इंद्रा यांना वाचवण्यासाठी आला. त्याने आरोपींना सांगितलं की, ‘इंद्रा या तुमच्या आईसारख्या आहेत.’ पण आरोपींनी हरिसिंह यांच्यावरदेखील कुऱ्हाडीनं वार करत त्यांना ठार मारलं. आरोपींच्या हल्ल्यातून आईला वाचवण्यासाठी इंद्रा यांचा मुलगा मध्ये पडला. परंतु, त्याच्या गळ्यावर सुद्धा आरोपींनी वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. (पैशांची लालसा महिला शिक्षिकेला भोवली, केलं हे कृत्य अन् गमावली सरकारी नोकरी) या वेळी दोन आरोपींपैकी एकानं कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सुरू असतानाच कवर कुटुंबातील एक मुलगी घटनेची माहिती देण्यासाठी 200 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेचं गांर्भीय ओळखून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावर धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, मयत इंद्रा कवर यांचा पती रतनसिंह हैदराबाद इथं व्यवसाय करतो. पोलिसांनी फोन करून त्यांना घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची मोदरान गावासह पंचक्रोशीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. घटनेनंततर मोदरान गावात भीतीचं वातावरण असून खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात