जयपुर, 11 डिसेंबर : महाराष्ट्रातील नागपुरमधील (Nagpur News) एका खासगी रुग्णालयाबाहेर पाणी पुरी विकणाऱ्या एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीशी मैत्री केली. मूळत: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ही तरुणी जयपूरमधील एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग करते. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले. यादरम्यान पाणीपुरीवाल्याने मुलीसोबत दुष्कृत्य (Crime News) करीत त्याचा व्हिडीओ शूट केला. आधी मध्य प्रदेशच्या हॉटेलमध्ये आणि नंतर जयपूरच्या हॉटेलमध्ये केलं दुष्कृत्य मध्य प्रदेशातील देवास निवासी अमितेष कुमार विश्वकर्मा याने इन्स्टाग्रामवरुन जयपूरमधील एका मेडिकल कॉलेजमधून नर्सिग करणाऱ्या विद्यार्थिनीशी मैत्री केली. यानंतर अमितेशने विद्यार्थिनीला देवास येथे बोलावलं आणि हॉटेलमध्ये नेत तिच्यावर दुष्कृत्य केलं. काही दिवसांनंतर तो जयपूरला आला आणि येथील सिंधी कॅम्पस्थित हॉटेलमध्ये 4 दिवसांपर्यंत दुष्कृत्य केलं. आरोपी तरुण अमितेश कुमारने पीडित विद्यार्थिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील बारकोड स्कॅन करून तिच्या मोबाइलमधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले होते. यानंतर आरोपी तरुण आणि विद्यार्थिनीमध्ये वाद झाला. पीडितेला बदनाम करण्यासाठी तो अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा- गर्लफ्रेंडने उचलला नाही फोन, नाराज प्रियकराने मध्यरात्री केलं धक्कादायक कृत्य पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना पाठवला अश्लील व्हिडीओ.. विद्यार्थिनीचे कॉन्टॅक्ट नंबर शेअऱ केल्यानंतर आरोपी अमितेशने पीडितेच्या कॉन्टॅक्ट्सचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्यामध्ये तरुणाने अश्लील व्हिडीओ व्हायरल केेले. यानंतर पीडितेने पोलिसात गुन्हा दाखल केला. यानंतर मात्र नागपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या बाहेर ठेला लावणाऱ्या पाणीपुरीवाल्याला तातडीने अटक करण्यात आली.