JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लेकाच्या लग्नात डीजेवर नाचता नाचता आईचा मृत्यू; नवरदेवाच्या कुशीतच सोडला जीव

लेकाच्या लग्नात डीजेवर नाचता नाचता आईचा मृत्यू; नवरदेवाच्या कुशीतच सोडला जीव

मुलाच्या लग्नात आई खूप आनंदात होती. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तीदेखील मनसोक्त डान्स करीत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 13 फेब्रुवारी : आपल्या मुलाच्या लग्नात (Marriage) डीजेवर डान्स करताना त्याच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला. नवरदेवदेखील आईसोबत डान्स करीत होता. नवरदेवाने लगेच खाली पडलेल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने नवरदेवाच्या कुशीत जीव सोडला. ही संपूर्ण घटना तेथील एका तरुणाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी घडली. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलवरच्या चिकानीमध्ये सतीश आणि निलम यांचा मुलगा नीरज याचं लग्न होतं. बरात किशनगडपासून बंबोरा येथे जाणार होती. येथे 4 फेब्रुवारी रोजी सप्तपदी होणार होत्या. 55 वर्षीय आई निलम यांची तब्येत 3 फेब्रुवारी रोजी लग्नापूर्वीच्या विधीत चांगली होती. यानंतर रात्री डीजेवर डान्स सुरू होता. यादरम्यान निलमलाही डान्स करण्याचा आग्रह केला. त्या डान्स करता करता अचानक खाली कोसळल्या. मुलाने तातडीने आईला सांभाळलं आणि तिला रुग्णालयात घेऊन गेला. येथे डॉक्टरांनी निलमला मृत घोषित केलं. अवघ्या 20 सेंकदात मृत्यू कुटुंबीयांनी सांगितलं की, निलम यांनी सेकंदापूर्वीच डान्स सुरू केला होता. मुलगा नीरजदेखील आईसोबत डान्स करीत होता. इतक्यात नवरदेवाची आई डान्स करता करता खाली कोसळली. यादरम्यान त्यांचा हार्टफेल झाल्याचं सांगितलं जात आहे. अवघ्या 20 सेकंदात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलाने आधी आईवर अंत्यसंस्कार केले. डोळ्यातील अश्रू थांबले नसताना पुढील चार दिवसात तो वरात घेऊन लग्नासाठी पोहोचला. केवळ सप्तपदी झाला. स्थानिकांचं म्हणणं आहे की, जिल्ह्यात अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. हे ही वाचा- मांत्रिकाने स्मशानातून उकरून काढले होते 30 मुलांचे मृतदेह अन् 11 वर्षांचा बळी महिलेला आधीच हृदयविकाराचा त्रास.. गावकऱ्यांनी सांगितलं की, महिलेला आधीपासून हृदयविकाराचा त्रास होता. यामुळे तिची औषधं देखील सुरू होती. याकारणामुळे डान्स करीत असताना त्यांचं हृदय बंद पडल्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात लग्न समारंभांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तब्बल 2 महिन्यांपूर्वी राजसमंद गावातील नवरदेवाच्या छोट्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या