JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गणिताच्या शिक्षकाने Online Class दरम्यान शेअर केला पॉर्न VIDEO; 2 तासांपर्यंत हटवला नाही अश्लील प्रकार

गणिताच्या शिक्षकाने Online Class दरम्यान शेअर केला पॉर्न VIDEO; 2 तासांपर्यंत हटवला नाही अश्लील प्रकार

मुलांच्या लॅपटॉप-मोबाइलवर हे दृश्य पाहून विद्यार्थ्यांचे आई-वडील हैराण झाले.

जाहिरात

वेबसाइट फेक आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाइटच्या पेजवरील कंटेंटची क्वालिटीही तपासणं महत्त्वाचं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 5 जानेवारी : उदयपुरच्या (Rajasthan News) सेंट पॉल शाळेच्या शिक्षकाने ऑनलाइन क्लासदरम्यान (Online Class) अॅपवर पॉर्न व्हिडीओची लिंक शेअर केली. लिंक पाठवताच अनेक विद्यार्थ्यांनी ती लिंक ओपन करून पाहायला सुरुवातही केली. मुलांच्या लॅपटॉप-मोबाइलवर हे दृश्य पाहून विद्यार्थ्यांचे आई-वडील हैराण झाले. यानंतर (Shared porn video link on the school app during an online class) विद्यार्थ्यांनी शिक्षकाला (Mathematics teacher) फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मात्र अॅपचं सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक तास लिंक हटवण्यात आली नाही. शहरभरात या घटनेबद्दल चर्चा सुरू आहे. शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापकांनी हा मानवी चूक असल्याचं सांगून काहीही सांगण्यास नकार दिला. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही संपूर्ण घटना सरदारपूरा स्थित सेंट पॉल शाळेत 10 वीच्या ऑनलाइन क्लासदरम्यान घडली होती. यादरम्यान सकाळी 8.30 वाजता दररोज प्रमाणे शाळेच्या अॅपवर शिक्षक लिंक शेअर करीत होते. यादरम्यान गणिताच्या शिक्षकानेही लिंक शेअर केली. विद्यार्थ्यांनीही लिंक क्लिक करून पाहिली तर तो पॉर्न मूव्हीचा यूआरएल होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पालकांनी शाळेच्या व्यवस्थापकांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. हे ही वाचा- औरंगाबाद: धावत्या दुचाकीवर GF सोबत KISSING सीन करणाऱ्या तरुणाला अटक शाळेचा सर्वर होता डाऊन, अनेक तास लिंक हटवलीच नाही… यानंतर तब्बल 2 तासांपर्यंत ही लिंक हटवण्यात आली नाही. सातत्याने पालक या कृत्याबद्दल शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापकांवर संताप व्यक्त करीत होते. तर व्यवस्थापकांनी मानवी चूक असल्याचं सांगून पालकांची माफी मागितली. सध्या या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका पालकाने दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार, शाळेत त्यांचा मोठा मुलगा 10 वीच्या वर्गात शिकतो. मुलाने लिंक ओपन केली, तर अश्लील चित्रपट सुरू झाला. ही मानवी चूक असल्याचं सांगण्यात आलं. मात्र शेकडो मुलांपर्यंत अशा प्रकारची लिंक शेअर होतं, अत्यंत लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली जात आहे.  या प्रकरणात शिक्षकाने सांगितलं की, अभ्यासाची लिंक शेअर करण्याऐवजी चुकून दुसऱ्या ग्रुपमधील लिंक कॉपी-पेस्ट झाली.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या