Home /News /aurangabad /

धावत्या दुचाकीवर 'खुल्लम खुल्ला प्यार' करणाऱ्या तरुणाला अटक, KISSING स्टंटमागचं सांगितलं कारण

धावत्या दुचाकीवर 'खुल्लम खुल्ला प्यार' करणाऱ्या तरुणाला अटक, KISSING स्टंटमागचं सांगितलं कारण

Kissing Video in Aurangabad: थर्टी फर्स्टच्या रात्री औरंगाबादेतील रस्त्यावर धावत्या दुचाकीवर खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या तरुणाला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    औरंगाबाद, 05 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण आणि तरुणी धावत्या दुचाकीवर एकमेकांना किस करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या घटनेची दखल जिन्सी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. सूरज गौतम कांबळे असं अटक केलेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बीड बायपास परिसरातील अलोकनगर येथील रहिवासी आहे. 31 डिसेंबर रोजी घटनेच्या रात्री त्याने आपल्या मित्रांसमवेत 'तडप' चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत क्रांती चौकात आला. यावेळी त्याच्या काही मित्रांनी त्याला धावत्या दुचाकीवर स्टंट करण्याचं चॅलेंज दिलं. त्यानेही मित्रांचं चॅलेंज स्विकारलं आणि क्रांती चौक परिसरात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला बोलावून घेतलं. हेही वाचा-हॉस्टेलमधून सुरू झालेला चोरीचा प्रवास जेलमध्ये संपला; डबल MAकेलेल्या तरुणीला अटक त्यानंतर आरोपी सूरज याने आपल्या प्रेयसीला दुचाकीच्या टाकीवर आमनेसामने बसवलं. अशाच अवस्थेत किसिंग करत त्याने क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि पुन्हा सेव्हन हिल ते क्रांती चौक असा प्रवास केला आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांनी त्यांचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी या घटनेची दखल घेत, धावत्या दुचाकीवर खुल्लम खुला प्यार करणाऱ्या सूरजला अटक केली आहे. हेही वाचा-Kolhapur: 'आमचं प्रेम कुणाला कळलंच नाही', सुसाईड नोट लिहून कपलने संपवलं जीवन या घटनेबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सूरज हा सूतगिरणी चौकातील एका कापड दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो शहरातील एका महाविद्यालयात एम. ए.चे शिक्षण घेत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर दुचाकीवर स्टंट करणारी 19 वर्षीय युवती ही त्याची नातेवाईक असून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. तसेच आपण तिच्याशी लग्न करणार असल्याचंही सूरजने पोलिसांना सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या