JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडचा घेतला भयंकर सूड; आयुष्य केलं उद्धवस्त

लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडचा घेतला भयंकर सूड; आयुष्य केलं उद्धवस्त

एका युवकानं तरुणीसोबत आधी मैत्री (Friendship) केली आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध (Sexual Relationship) ठेवले. मात्र, तरुणीचं लग्न (Marriage) दुसरीकडे ठरताच त्यानं तिच्या सासरी फोन केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 15 जुलै : एका युवकानं तरुणीसोबत आधी मैत्री (Friendship) केली आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध (Sexual Relationship) ठेवले. मात्र, तरुणीचं लग्न (Marriage) दुसरीकडे ठरताच त्यानं तिच्या सासरी फोन केला. फोन करून त्यानं म्हटलं, की तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडलं. हा युवक स्वतःही आधीपासूनच विवाहित (Married) आहे. ही बाब युवतीच्या घरच्यांना समजल्यानं त्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं होतं. मात्र, युवकानं इथेही तिला धोका दिला. आधी हातपाय बांधले मग तोंडात कापडाचा बोळा कोंबून मेहुण्यांनी दाजीला धू धू धुतलं ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमधील आहे. यानंतर तरुणीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले आणि युवकावर गुन्हा दाखल केला. ग्वालियरच्या मेवाती इथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीनं शेजारीच राहणाऱ्या गगन यादवविरोधात तक्रार दिली आहे. युवतीनं तक्रारीत म्हटलं, की तिची पाच वर्षांआधी आरोपीसोबत ओळख झाली. मैत्री अधिक घट्ट होताच या युवकानं तरुणीला माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगितलं. यासोबत लग्न करून आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. यानंतर त्यानं तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. पाच वर्ष संबंध ठेवल्यानंतर तरुणीनं जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा त्यानं नकार दिला. युवतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता समोर आलं की हा युवक आधीपासूनच विवाहित आहे. यानंतर तरुणीनं त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. बायकोनं ‘अशी’ पकडली नवऱ्याची Love Affairs, लंपट पतीला झाली ‘पळता भुई थोडी’ याच दरम्यान तरुणीचं शहरातील एका व्यक्तीसोबत लग्न जमलं. लग्नाची तारीख ठरणार होती, इतक्यात तिच्या होणाऱ्या सासरी एका नंबरवरुन फोन आला. कॉल केलेल्या व्यक्तीनं सांगितलं, की त्यांची होणार सून आधीच दुसऱ्याच झालेली आहे. यानंतर ठरलेलं लग्नही मोडलं. याबाबत अधिक चौकशी केली असता तरुणीला समजलं की हा फोन गगननं केला होता. यानंतर लगेचच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या