JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नी माहेरी गेल्याचं शेजाऱ्यांना सांगायचा; एका महिन्याने झाला हादरवणारा खुलासा, घरामागे दिसलं भयानक दृश्य

पत्नी माहेरी गेल्याचं शेजाऱ्यांना सांगायचा; एका महिन्याने झाला हादरवणारा खुलासा, घरामागे दिसलं भयानक दृश्य

रंजन बडी यांचं घरातील काही कारणावरून पत्नी सावित्रीसोबत भांडण झालं. यानंतर आरोपीने पत्नीची हत्या केली आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी तिचा मृतदेह घराच्या मागे पुरला.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुबनेश्वर 22 ऑक्टोबर : ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह घराच्या मागे पुरला. पत्नीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सावित्री बडी असं मृत महिलेचं नाव आहे. नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल मिळालेल्या माहितीनुसार, जमनकिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडमाळ रौतापाडा गावात रंजन बडी यांचं घरातील काही कारणावरून पत्नी सावित्रीसोबत भांडण झालं. यानंतर आरोपीने पत्नीची हत्या केली आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी तिचा मृतदेह घराच्या मागे पुरला. महिलेच्या हत्येनंतर एक महिन्याने ही हत्या उघडकीस आली. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी कुचिंदा पोलीस ठाण्यात सावित्री बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. कुचिंदा उपविभागीय पोलीस अधिकारी राजकिशोर मिश्रा म्हणाले, “सावित्री बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून तिचा पती रंजन याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सावित्रीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घराच्या मागे पुरण्यात आला होता.’ डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक याशिवाय हत्येचा आरोप असलेल्या पतीने पोलिसांना सांगितलं की, घटना घडल्यानंतर शेजारी सावित्रीबद्दल विचारायचे. तो त्यांना सांगत असे की त्याची पत्नी माहेरी गेली आहे. यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. दुसरीकडे हत्येबाबत पोलीस अधिकारी मिश्रा यांनी सांगितलं की, रंजनला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसंच न्यायदंडाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली दफन केलेला मृतदेह फॉरेन्सिक टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या