JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / प्रेयसीने लग्न केले नाही म्हणून गिफ्ट म्हणून दिला 'बॉम्ब', नंतर जे घडलं ते धक्कादायक

प्रेयसीने लग्न केले नाही म्हणून गिफ्ट म्हणून दिला 'बॉम्ब', नंतर जे घडलं ते धक्कादायक

लग्न म्हंटल की भेटवस्तु ही आलीच आणि ही भेटवस्तू उघडण्यासाठी आपण नेहमी आतुर असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्तीसगड (सुमित कुमार), 05 एप्रिल : लग्न म्हंटल की भेटवस्तु ही आलीच आणि ही भेटवस्तू उघडण्यासाठी आपण नेहमी आतुर असतो. मात्र, मित्रांकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंबाबत लोक सावध असतात. कारण कधी-कधी मित्र भेटवस्तूंच्या बहाण्याने आपली गंमत करू शकतात. असाच एक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. परंतु भेटवस्तू देण्याच्या नावाखाली बदला घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा बदला असा होता की नवरदेवाचा आणि त्याच्या भावाला जीव गमवावा लागला आहे.

NDTV दिलेल्या माहितीनुसार, एका नवविवाहित पुरुषाला आणि त्याच्या भावाला लग्नाची भेट म्हणून मिळालेली होम थिएटर म्युझिक सिस्टीम सोमवारी प्लग इन करताना स्फोट झाला. हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. या स्फोटात अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. होम थिएटरमध्ये बॉम्ब बसवण्यात आला होता. दरम्यान या सगळ्या कटामध्ये मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडने केल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस तपासात उघड झाले आहे. ही घटना छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील आहे.

 

संबंधित बातम्या

स्फोटाच्या धक्क्याने ज्या खोलीत होम थिएटर ठेवण्यात आला होता त्या खोलीच्या भिंती आणि छत ढासळल्याचे बोलले जात आहे. पोली म्हणाले की, 22 वर्षीय हेमेंद्र मारवी या नववराने होम थिएटर सिस्टम चालू केल्यावर मोठा स्फोट झाला. यामुळे वराचा जागीच मृत्यू झाला. तर वराच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिस तपासादरम्यान, होम थिएटरमध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवल्यामुळे हा स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी लग्नादरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंची यादी तपासण्यास सुरुवात केली असता, त्यांना म्युझिक सिस्टीम वधूच्या माजी प्रियकराने भेट दिल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केल्यावर हे प्रकरण समोर आले आहे.

जाहिरात

कबीरधामच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा ठाकूर यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की तो त्याच्या माजी मैत्रिणीशी लग्न केल्यामुळे नाराज झाला होता, म्हणून त्याने तिला आतमध्ये स्फोटके असलेली होम थिएटर सिस्टीम भेट दिली.  

लोकलच्या दारात अडला, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी तुडवला; दिवा स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमेंद्र मारवी यांचा १ एप्रिल रोजी विवाह झाला होता. त्याचा 30 वर्षीय भाऊ राजकुमार आणि दीड वर्षाच्या मुलासह इतर चार जण जखमी झाले असून त्यांना कावर्धा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, उपचारादरम्यान राजकुमारचा मृत्यू झाला. तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या