जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / लोकलच्या दारात अडला, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी तुडवला; दिवा स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

लोकलच्या दारात अडला, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी तुडवला; दिवा स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

लोकलच्या दारात अडला, प्रवाशांनी लाथाबुक्क्यांनी तुडवला; दिवा स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

दरवाजा अडवून बसलेल्या प्रवाशाला लोकलमधील प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 एप्रिल : मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये जागा मिळवताना, स्टेशनवर चढ-उतार करताना बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यात मोठ्याने आवाज चढवून बोलणं किंवा अंगावर धावून जाण्यापर्यंतचे वाद हे नेहमीचेच असतात. पण आता कर्जत फास्ट लोकलमध्ये झालेला प्रकार धक्कादायक असा आहे. दरवाजा अडवून बसलेल्या प्रवाशाला लोकलमधील प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत फास्ट लोकलमध्ये सोमवारी हा प्रकार घडल्याचं समजते. यावेळी लोकलच्या दरवाजात उभा असलेल्या प्रवाशाने वाट अडवून धरली होती. यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी दरवाजा अडवून धरणाऱ्यांना खाली खेचत मारहाण केली. प्रवाशांनी अक्षरश: लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

जाहिरात

आई-वडिलांसोबत ऊस तोडायला गेलेल्या लेकीसोबत भयानक घडलं, धाराशीव हादरलं   याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकात ३ नंबर प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली. सीएसएमटीवरून कर्जतला जाणारी रेल्वे ७.१० वाजता दिवा स्टेशनला पोहोचली. लोकलमध्ये गर्दी होती आणि प्रवाशांना स्टेशनवर उतरायचे होते. पण एका प्रवाशाने दरवाडा अडवून ठेवला होता. तेव्हा दिवा स्टेशनवरील प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला मागे जाण्यास सांगितलं पण तो तिथेच अडून बसला. यावरून वाद सुरू झाला आणि प्रवासी संतापले.

News18लोकमत
News18लोकमत

लोकल थांबताच प्रवाशांनी दरवाजातील व्यक्तीला बाहेर खेचत प्लॅटफॉर्मवर मारहाण केली. प्रवाशांचा राग इतका अनावर झाला होता की अनेकांनी त्या व्यक्तीला लाथांनी मारहाण केली. दरम्यान, या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखलं झालं. मार खाणारा आणि मारहाण करणारे सगळेच तिथून निघून गेले होते. आता पोलिस मारहाण झालेल्या प्रवाशाला शोधत असून त्याची ओळख पटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात