JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Dhule Crime : पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला कळल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल

Dhule Crime : पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला कळल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल

Dhule Crime: सुनील पावरा याने 13 मे रोजी त्याची पत्नी निर्मला पावरा ही बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिली होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिरपूर, 3 जून : पती-पत्नीच्या नात्यात भांडण (Husband Wife Dispute) स्वाभाविक आहे. मात्र, या भांडणाचे रुपांतर अनेकदा धक्कादायक घटनांमध्ये होते. काही वेळा पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासल्याच्या घटना घडतात. अनैतिक संबंधावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचेही तुम्ही वाचले असेल. शिरपुरमध्ये पती-पत्नीसंदर्भात अशीच एक धक्कादायक घटना घडली. काय आहे घटना - शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथील एका व्यक्तीची पत्नी बेपत्ता झाली होती. त्या महिलेचे चुलत सासऱ्याशी अनैतिक संबंध (Wife Immoral Relation) होते. याचाच राग मनात धरून त्या व्यक्तिने आपल्या पत्नीची हत्या (Wife Murder) केली. पोलिसांनी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले आहे. अटक केल्यानंतर त्यानेच ही हत्या केली आहे, अशी कबूली दिली. सुनिल रुलसिंग पावरा असे आरोपी पतीचे नाव आहे. तर निर्मला पावरा असे हत्या करण्यात आलेल्या मृत पत्नीचे नाव आहे. पत्नीबाबत मिळाली होती माहिती -  सुनील पावरा याने 13 मे रोजी त्याची पत्नी निर्मला पावरा ही बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर 29 मेला सुनील पावरा याला धक्कादायक माहिती कळाली. त्याची पत्नी निर्मला ही कन्नड घाटाजवळ एका झोपडीत आपल्या काकासोबत राहत आहे, अशी माहिती सुनीलला मिळाली होती. माहिती मिळताच तो लगेचच त्याठिकाणी गेला. तिथे गेल्यावर त्याने आपल्या पत्नीला विश्वासात घेतल्यानंतर ती त्याच्यासोबत घरी यायला तयार झाली. यानंतर 30 मेला ते रात्री उशिरा कन्नड येथून नटवाडे येते पोहोचलेल्या सुनीलने आपली पत्नी निर्मला हिची हत्या केली. करवंद ते नटवाडे गावात जाणाऱ्या रस्त्याला लागून रमेश रजन पावरा यांचे शेत आहे. या शेतालगत असलेल्या चारीमध्ये पत्नी निर्मला हिच्या डोक्यात दगड टाकून ठेचून सुनीलने तिचा खून केला. या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी सुनीलने निर्मलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या शरीराला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळून घरी निघून गेला. हेही वाचा -  लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत बसून अशी आली घटना समोर - दुसऱ्या दिवशी 31 मेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावातील पोलीस पाटील प्रकाश पावरा यांनी एका महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाबाबत शिरपूर पोलिसांना (Shirpur Police) माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मागील महिनाभरातील बेपत्ता महिलांच्या नोंदी घेतल्या. यात 13 रोजी सुनील पावरा याने आपली पत्नी बेपत्ता झाली आहे, अशी नोंद केल्याचे सापडले. यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर गुह्याचे सर्व तार जुळले. चौकशीदरम्यान, निर्मलाचा पती सुनील यानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. चुलत सासऱ्याशी अनैतिक संबंध होते. याचाच राग मनात धरून या महिलेची हत्या केली, अशी पतीने कबूली दिली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या