JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हुंड्यात दुचाकी न मिळाल्यानं पत्नीसोबत अमानुष कृत्य; आधी मारहाण मग हातपाय बांधून...

हुंड्यात दुचाकी न मिळाल्यानं पत्नीसोबत अमानुष कृत्य; आधी मारहाण मग हातपाय बांधून...

एका घटनेत पतीनं हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीला (Wife) मारहाण केली आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर पुढे त्यानं पत्नीचे हातपाय बांधले आणि तिचे डोक्याचे संपूर्ण केस काढून टाकले (Dowry Harassment).

जाहिरात

फक्त राजस्थानच नव्हे तर अगदी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, हरियाणा अशा बाहेरच्या राज्यातूनही या कामासाठी मुलींना बोलावलं जायचं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 16 जुलै: नुकतंच समोर आलेल्या एका घटनेत पतीनं हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीला (Wife) मारहाण केली आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर पुढे त्यानं पत्नीचे हातपाय बांधले आणि तिचे डोक्याचे संपूर्ण केस काढून टाकले (Dowry Harassment). पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बहराइचमधील (Bahraich) आहे. नेपाळचा रहिवासी असलेल्या अमजद अलीनं आपली मुलगी बसीरुन हिचं लग्न 5 वर्षापूर्वी बहराइच येथील मटेरा क्षेत्रातील समोखनचा रहिवासी असलेल्या साजिद साईंसोबत केलं होतं. असा आरोप आहे की साजिद सुरुवातीपासून हुंड्याची मागणी करत बायकोला त्रास देत होता. अमजद अलीनं सांगितलं की आरोपी एक लाख रूपये आणि दुचाकी मागत होता. Muslim Dating Apps : डेटिंग अ‍ॅप्सला भारतीय मुस्लिमांचा कसा मिळतो प्रतिसाद? अमजद अलीनं सांगितलं, की मागण्या पूर्ण होत नसल्यानं त्यांच्या मुलीला मागच्या पाच वर्षांपासून सतत छळाचा सामना करावा लागत होता. अनेकदा समजूत काढून ते मुलीला तिच्या सासरी सोडून आले. मात्र, आता तिच्या पतीनं अमानुषपणाच्या साऱ्या हद्दीच पार केल्या. त्यांनी सांगितलं, की आधी त्यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली आणि नंतर तिचं मुंडन केलं. Maharashtra 10th result 2021: क्रॅश झालेली वेबसाईट सुरु होण्यास लागेल इतका वेळ पीडितेनं सांगितलं, की न्याय मागण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेली मात्र तिला न्याय मिळाला नाही. तिची तक्रार ऐकून घेण्याआधीच तिला आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिनं न्याय मागण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या