मध्य प्रदेश, 6 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) मंदसौर जिल्ह्यात पोलिसांनी हत्या (Murder) प्रकरणात मृत तरुणीच्या वहिनीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी भानपुरामध्ये राहणारी 14 वर्षीय हर्षिता अचानक गायब झाली होती. घरातील मंडळींनी तिला खूप शोधलं. शेवटी घराजवळील एका विहिरीत हर्षिताचा मृतदेह (Dead body found in well) सापडला. यानंतर 2 ऑक्टोबर रोजी हर्षिताच्या वडिलांना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान मृत महिलेच्या गळ्याभोवती आणि नाकावर जखमा दिसल्या. त्याशिवाय विहिरीचं झाकणं बंद होतं. त्याशिवाय हर्षिकाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये (Postmortem Report) मृत्यूपूर्वी जखमा आणि पाण्याच बुडल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (madhya pradesh vahini murder sister in law) हे ही वाचा- सेक्स वर्करने लावला 25 कोटींचा चुना; वयस्क व्यक्तीने व्यक्त केला पश्चाताप या प्रकरणात घरातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात मृत हर्षिकाच्या मृत ठिकाणाचाही तपास करण्यात आला. तपासादरम्यान कुटुंबातील सदस्यांवर संशय असल्याने मृत तरुणीच्या 22 वर्षीय वहिनी रश्मीची चौकशी केली. शेवटी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने सर्व घडलेली हकीकत सांगितली. आरोपी वहिनीने सांगितलं की, लग्नानंतर तिची नणंद दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी पती ऐश्नर्य आणि सासऱ्याला सांगायची. तिच्या चुगली करण्याच्या स्वभावाला रश्मी वैतागली होती. 1 ऑक्टोबर रोजी आरोपी वहिनी आणि तिची नणंद घरात आंधळी कोशिंबीर खेळत होते. यादरम्यान वहिनीने पहिल्यांदा नणंदला चाकूने हल्ला केला. आणि त्यानंतर तिला खेचत खेचत विहिरीत फेकून दिलं. आपला गुन्हा कबुल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वहिनीला आपल्या नंणंदेच्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक केलं आहे.