JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / गँगस्टर अतिक अहमद याची हत्या, पोलिसांसमोरच हत्येचा LIVE VIDEO

गँगस्टर अतिक अहमद याची हत्या, पोलिसांसमोरच हत्येचा LIVE VIDEO

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

जाहिरात

हत्येचा लाईव्ह व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रयागराज, 15 एप्रिल : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही आरोपी भावांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी येथे आणले असता स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही भाऊ हॉस्पिटलमध्ये जाताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहेत. अचाक अतिक अहमद याच्या डोक्याला कुणीतरी पिस्तूल लावून गोळी झाडली. अशरफला ही गोष्टी कळेपर्यंत त्याच्यावरही जोरदार फायरींग झाली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रयागराजचे मुख्य न्यायदंडाधिकारी दिनेश गौतम यांच्या न्यायालयाने गुरुवारी अतिक आणि अशरफ यांना उमेश पाल खून प्रकरणात 13 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

संबंधित बातम्या

कोण होता अतिक अहमद? गेल्या काही दिवसांपासून माफिया अतिक अहमद हा चर्चेत आला होता. बसपा आमदार राजू पाल हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पालच्या हत्येनंतर यूपी पोलीस अतिक अहमदवर नजर ठेवून होते. उमेश पालचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी अतिक याला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आलं आहे. गेल्या 43 वर्षांत अतिकवर खून, लूट, दरोडा अशा गंभीर कलमांतून 100 हून अधिक गुन्हे दाखल होते. माफिया अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.

25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांचा भरदिवसा खून केल्याचा आरोप झाला. 28 फेब्रुवारी 2006 रोजी, राजू पाल खून खटल्यातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला त्याच्या साक्षीशी संबंधित प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली. 2007 मध्ये अतिकने सोनिया गांधी यांच्या नातेवाईकाची मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, पीएमओच्या नाराजीनंतर ताबा सोडला. वाचा - मीडियाशी बोलत असतानाच डोक्याला बंदूक लागली अन्.. गँगस्टर अहमद भावांची हत्या 2012 मध्ये अतिकच्या भीतीमुळे, 10 न्यायाधीशांनी त्याच्या खटल्याच्या सुनावणीपासून स्वतःला दूर केले. 2018 मध्ये अतिक अहमदवर लखनऊमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला देवरिया तुरुंगात नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यूपीच्या तुरुंगात असतानाही अतिक तुरुंगातूनच आपला गुन्हेगारी व्यवसाय चालवत होता. अतिक अहमदवर कारवाई करण्यासाठी त्याला गुजरातमधील साबरमती कारागृहात हलवण्यात आले. 2019 मध्ये अतिक अहमद याने वाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. गुजरातच्या साबरमती कारागृहातूनही अतिकच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. 24 फेब्रुवारी 2023 रोजी राजू पाल खून प्रकरणाचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्यासह त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन हवालदारांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर झाला. आता 28 मार्च रोजी, 2006 मधील उमेश पाल अपहरण प्रकरणात MP-MLA न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी अतिक अहमदला आज साबरमतीहून प्रयागराजला नेले जात आहे. अहमद हे समाजवादी पक्षाचे (एसपी) माजी खासदार असून जून 2019 पासून साबरमती तुरुंगात आहेत. उत्तर प्रदेशातील तुरुंगात असताना रिअल इस्टेट बॅरन मोहित जैस्वाल यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने त्याचं स्थानांतर केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या