JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'माझी, माझी' म्हणत एका तरुणीसाठी आपसात भिडले 2 तरुण; पण समोर आलं तिचं भलतंच सत्य

'माझी, माझी' म्हणत एका तरुणीसाठी आपसात भिडले 2 तरुण; पण समोर आलं तिचं भलतंच सत्य

जिच्यासाठी दोघंही भांडत होते, तिच्याबाबत असं काही समजलं की दोघांनाही धक्का बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 09 जुलै : एखाद्या तरुणीवर किती तरी तरुण प्रेम करतात (Love story). पण त्यांच्यामध्ये त्या तरुणीसाठी जणू स्पर्धाच लागते. ती आपलीच होणार असं चॅलेंचही तरुण एकमेकांना देतात आणि तिला मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात (Love triangle). राजस्थानमध्येही प्रेमाचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे (Girlfriend Boyfriend). एका तरुणीसाठी दोन तरुण आपसात भिडले पण या भांडणात त्यांचं भलतंच सत्य त्यांच्यासमोर आलं. तरुणीबाबत असं काही समजलं की दोन्ही तरुणांना मोठा धक्काच बसला (2 Boys fight for one girlfriend). राजस्थानच्या जयपूरमधील हे प्रकरण. दोन तरुण एका तरुणीसाठी भांडू लागले. आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणासोबत असल्याचं अचानक समजताच दोघंही आमनेसामने आले आणि त्या तरुणीसाठी भांडण करू लागले. अखेर हे प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.  लोकांनी त्यांची तक्रार पोलीस ठाण्यात केली आणि त्या दोघांनाही पोलिसात आणण्यात आलं. जिच्यासाठी ते भांडत होते, ती तरुणीही पोलीस ठाण्यात आली पण काही वेळाने ती गायब झाली. हे वाचा -  बायकोशी खोटं बोलणं, लपवाछपवी पडली महागात; पोलिसांनी नवऱ्याला ठोकल्या बेड्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांना जगतपुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. गुरुवारी रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालं.दोघंही एकाच तरुणीसाठी भांडत होते. स्थानिकांनी सांगितल्यानुसार दोन्ही तरुण ‘ती माझी आहे, ती माझी आहे’ म्हणत आपासत भिडले.  याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणलं. हे वाचा -  प्रपोज करण्याची डेअरिंग होईना! न बोलता असं व्यक्त करा प्रेम; तीसुद्धा तुमच्या प्रेमात पडेल माहितीनुसार या तरुणीचं गेल्या काही वर्षांपासून दोन्ही तरुणांसोबत अफेअर सुरू होतं. अचानक त्या दोघांनाही आपली गर्लफ्रेंड एकच आहे, असं समजलं. धक्कादायक म्हणजे तरुणी दोन्ही बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि या तरुणांना याची माहितीच नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या