सर्वेश दुबे, प्रतिनिधी प्रयागराज, 5 जून : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळलेल्या एका खेळाडूच्या भावावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसात तैनात असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने हे आरोप केले आहेत. धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप या महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील रहिवासी असलेल्या या महिला कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ कॉन्स्टेबलचा धर्म बदलून प्रेमविवाह केला होता. आता शिवकुटी पोलिस ठाण्यात महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती झाली आहे. तिने पतीवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. आरोपी हवालदार इम्रान खान देखील यूपी पोलिसात हवालदार पदावर आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर इम्रानने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकू लागला. आरोपीने महिला कॉन्स्टेबलच्या मुलाचाही धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सासरी एका कार्यक्रमादरम्यान तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला, असाही आरोप करण्यात आला आहे. महिला कॉन्स्टेबलने तिचा सासरा मुलतान खान, दीर आणि क्रिकेटर मोहसीन खान आणि पती इम्रान खान यांच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही यूपी पोलिसातील हवालदार असल्याने प्रकरण दडपले जात आहे. आरोपी दीर हा क्रिकेटपटू आहे आणि यावेळी तो आयपीएलमध्ये लखनौ सपूर जायंट्सचा भाग होता. एसीपी शिवकुटी राजेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पती-पत्नीच्या अंतर्गत भांडणाचे आहे. इम्रान खानला आधीच इस्लाम धर्मातील पत्नी आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने संपूर्ण चौकशीनंतरच याप्रकरणी कारवाई केली जाईल. डीसीपी दीपक भुकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महिला कॉन्स्टेबलला आपली बाजू मांडण्याची सूचना केली आहे. या प्रकरणाचे तपासकर्ते आता पीडितेने दिलेल्या पुराव्यांचा त्यांच्या तपासात समावेश करतील, असे सांगण्यात येते.