JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / देवपूजा करतानाच प्रियकराने चिरला गळा; चिमुकलीच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडला जीव

देवपूजा करतानाच प्रियकराने चिरला गळा; चिमुकलीच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडला जीव

Murder News: देवपूजा करत असताना एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणानेच प्रेयसीला भयावह मृत्यू (Live in partner killed girlfriend) दिला आहे.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरत, 18 मार्च: देवपूजा (Worship) करत असताना एका महिलेची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणानेच प्रेयसीला भयावह मृत्यू दिला आहे. यावेळी संबंधित महिलेची एक वर्षाची मुलगी देखील तिथेच होती. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तसाच टाकून आरोपी प्रियकर ऑफिसला निघून गेला होता. त्यानंतर घरी येऊन कुणीतरी आपल्या प्रेयसीची हत्या केली असा बनाव त्यानं रचला होता. पण पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना गुजरातच्या सुरतमधील गौतमनगर सोसायटीत घडली आहे. स्नेहलता असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून ती मागील तीन वर्षांपासून आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर प्रकाश याला अटक (Accused arrested) केली आहे. आरोपीनं हत्येची कबुली दिली असून खुनाचं कारणही सांगितलं आहे. मुलीच्या नावावर संपत्ती करावी, यासाठी स्नेहलता वारंवार आपल्याला त्रास द्यायची, त्यामुळेच आपण ही हत्या (Murder) केली असल्याचा दावा प्रकाशने केला आहे. हेही वाचा- ‘मुलीला डॉक्टर बनवायचं होतं पण सगळं असह्य होतंय’ चिठ्ठी लिहून बापलेकीनं दिला जीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मंगळवारी स्नेहलता आपल्या राहत्या घरात देवपूजा करत होत्या. यावेळी त्यांची एक वर्षांची चिमुकली आसपासच खेळत होती. दरम्यान आरोपी प्रकाश याने संधी साधून अचानक स्नेहलता यांच्यावर वार केला आहे. त्यानं गळा चिरून स्नेहलता यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. त्यानंतर मृतदेह तसाच टाकून तो कामानिमित्त बाहेर निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी प्रकाशकडे चौकशी केली असता, त्यानं उडावाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. हेही वाचा- दहावीची परीक्षा द्यायला गेली अन् परतलीच नाही; लेकीच्या विरहात आईचा दुर्दैवी अंत आपण सायंकाळी कामावरून घरी आलो, तेव्हा स्नेहलता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर घरभर रक्ताचा सडा पडला होता, असा कांगावा सुरुवातीला प्रकाशने केला. त्यानं एक वर्षाच्या चिमुरडीला कडेवर घेत रडण्याचं नाटकही केलं. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. संशय आल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर प्रकाशनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या