रायपूर, 1 जानेवारी 2022 : एक महिला पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या तरुणासोबत लग्न करते. मात्र यानंतरही ती दुसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडले. हा फेसबुकवरील प्रियकर आधी महिलेला विष देतो आणि बेशुद्ध अवस्थेत गळा दाबून तिची हत्या (Crime News) करतो. सतना पोलिसांनी या हत्याकांडाचा (Murder) खुलासा केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यातील मझगाव येथे आली होती. तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांसह मिळून तिला आधी विष दिलं आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर तिला जवळील जंगलात फेकून दिलं. गेल्या 27 डिसेंबर रोजी मिळालेल्या या मृतदेहानंतर तपास सुरू झाला होता. आरोपी उत्तर प्रदेशात राहणारा… या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नंदू उर्फ नंदकिशोर यादव आणि अर्जुन पटेल याला अटक केली आहे. दोघेही बांदा जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्याच्याकडून निळ्या रंगाची अॅक्टिवा स्कूटी आणि मृत महिलेचा मोबाइल सापडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅगेतून छत्तीसगडचा पत्ता सापडला. 30 डिसेंबर रोजी या मोबाइल नंबरवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ही व्यक्ती महिलेचा दीर होता. त्याने सांगितल्यानुसार, ही महिला 22 डिसेंबरपासून स्कूटी घेऊन बेपत्ता आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मोबाइलमधून कॉल डिटेल्स बाहेर काढले आणि आरोपीसोबत जवळीक असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी नंदू आणि अर्जुन यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि महिला लग्न, एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचं सांगितलं. यामुळे दोघांनी आधी महिलेला विष दिलं, त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी नंदू महिलेची स्कूटी आणि मोबाइल घेऊन फरार झाला. आरोपी नंदूने महिलेला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी मित्र अर्जून याच्यासोबत मिळून 24 डिसेंबर रोजी हत्या केली. नंदूने आधी महिलेच्या जेवणात विष दिलं, मात्र विषामुळे तिचा मृत्यू झाला नसल्यानं त्याने महिलेचा गळा आवळला. विवाहित असतानाही प्रियकरासोबत लग्न आणि एकत्र राहण्याच्या हट्टापायी हत्या केल्याचं आरोपीने सांगितले. हे ही वाचा- 5 जण रिक्षातून करत होते प्रवास, एकाने अचानक चालकाच्या नरडीला लावला सुरा अन्…; महिलेचं पहिलं लग्न संजय शाहसोबत झालं होतं. यादरम्यान बांदा येथील नंदूची ऑनलाइन भेट झाली. फेसबुकवर दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं. ते एकमेकांसोबत मोबाइलवर बोलत होते. फेसबुकवर दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यानंतर नंदू अनेकदा तिला भेटायला छत्तीसगड देखील गेला होता. नंदूदेखील विवाहित आहे, यामुळे महिलेने हट्ट केल्यानंतर त्याने तिची हत्या केली.