JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नी-मुलीचं शिर वेगळं करून घेतला सेल्फी अन् FB वर केला शेअर; तरुणाचं थरकाप उडवणारं कृत्य

पत्नी-मुलीचं शिर वेगळं करून घेतला सेल्फी अन् FB वर केला शेअर; तरुणाचं थरकाप उडवणारं कृत्य

यानंतर पतीने आपल्या पत्नीच्या कापलेल्या शिरासोबत असं काही केलं की कोणाचाही थरकाप उडेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटना, 6 ऑगस्ट :  बिहारमधील एका गावातून अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. या तरुणाने आपली पत्नी आणि मुलीचं शिर धडापासून वेगळं केलं. तो इथपर्यंत थांबला नाही तर कापलेलं शिर घेऊन तो आपल्या सासरी पोहोचला. घरापासून 200 मीटर अंतरावरील एका पुलावर रक्ताने माखलेले शिर ठेवून फरार झाला.

कापलेल्या शिरांच्या खाली एक नोटही ठेवली होती. दुसरीकडे आरोपीच्या घरात पत्नी आणि मुलीचं धड पडलं होतं. तर मुलीचं कापलेलं शिर टेबलावर ठेवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयातून तरुणाने इतकं भयंकर पाऊल उचललं. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नीच्या धडासोबत सेल्फीही घेतली होती. याशिवाय हा फोटो त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. या फोटोमध्ये तो धड आणि कापलेल्या शिरासोबत दिसत आहे. यानंतर त्याने पत्नीचं शिर एका पिशवीत भरलं आणि ते तिच्या माहेरी घेऊन गेला.

महिलेच्या माहेरापासून 200 मीटरवर एक पुलावर शिर ठेवलं आणि त्याखाली एक नोटही ठेवली. मॉर्निग वॉक दरम्यान लोकांनी ते शिर पाहिलं तर गावात खळबळ उडाली. यानंतर तातडीने पोलिसांना बोलवण्यात आलं. महिलेचं कापलेलं शिर घेऊन पोलीस तिच्या माहेरी पोहोचले. माहेरच्यांना ते दृश्य पाहून धक्काच बसला. यानंतर महिलेच्या सासरी गेल्यावर तेथे तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेनंतर तरुण फरार झाला आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या