तिरुवअनंतपूरम, 5 मे : केरळमधील (Kerala) मलप्पुरममध्ये एका व्यक्तीने गुरुवारी धक्कादायक कृत्य केलं. त्याने पत्नी आणि एका मुलीला (Killed family) जिवंत जाळलं. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा त्याचा डाव होता, यात एक मुलगी सुदैवाने बचावली. मात्र ती भाजल्याने गंभीर जखमी झाली आहे. पत्नी व मुलींना जाळून टाकल्यानंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोंडीपरंबा येथील आहे. पत्नी आणि मुलीला मारहाणाऱ्या व्यक्तीचं नाव मोहम्मद असल्याचं समोर आलं आहे. त्याने रिक्षामध्ये मृत्यूचं सामान फीट केलं होतं. मोहम्मद सकाळी कासरगोड येथे आला होता. ऑटो घेऊन तो घरी गेला आणि पत्नी, दोन मुलींना यात बसायला सांगितलं. तिघी जशा रिक्षात बसल्या, रिक्षाला आग लागली. ते रिक्षातून खाली उतरू शकले नाही आणि जळाले. मोहम्मदची पत्नी आणि त्याच्या 11 वर्षांच्या मुलीचा जळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षांच्या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे ही वाचा- सरकारी शाळेतच चिमुरडीचा तडफडून मृत्यू; पाणी पिण्यासाठी गेली अन्… मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मदने ऑटोमध्ये स्फोटके ठेवली होती. त्याने स्फोटके अशा प्रकारे जोडली होती की पत्नी आणि मुली बसल्यानंतर लगेचच ऑटोने पेट घेतला. आग इतकी वेगाने पसरली की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. पत्नी आणि मुलींना जाळून टाकल्यानंतर मोहम्मदने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मोहम्मदने असं का केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.