JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / घृणास्पद! हात-पाय बांधून दलित तरुणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितलं असता पाजलं मूत्र

घृणास्पद! हात-पाय बांधून दलित तरुणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितलं असता पाजलं मूत्र

पोलीस उपनिरीक्षकाने आधी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात जबरी मारहाण (Sub Inspector Beat Dalit Youth) केली. इतकंच नाही तर चौकशीदरम्यान त्याला मूत्र पाजण्याचं (Forced to Drink Urine) किळसवाणं कृत्यही केलं.

जाहिरात

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरु 23 मे : एक अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा प्रकार सध्या समोर आला आहे. या घटनेत एका दलित तरुणानं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या तरुणाच्या म्हणण्यानुसार, पोलीस उपनिरीक्षकाने आधी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात जबरी मारहाण (Sub Inspector Beat Dalit Youth) केली. इतकंच नाही तर चौकशीदरम्यान त्याला मूत्र पाजण्याचं (Forced to Drink Urine) किळसवाणं कृत्यही केलं. तरुणानं या प्रकरणाची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या (Karnataka) चिकमंगलूरमधील गोनीबीड़ू पोलीस ठाण्यातील आहे. गोनीबीडू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पुनीतनं पोलीस उपनिरीक्षकावर असा आरोप केला, की पोलिसानं चौकशीदरम्यान त्याला मूत्र पाजले. पुनीतनं या राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांना पत्र लिहित याबाबतची तक्रार केली आहे. त्यानं त्याच्यासोबत झालेल्या या अमानवीय कृत्यासाठी त्याला न्याय मिळावा अशी मागणीही केली आहे. पुनीतनं आरोप केला आहे, की गोनीबीड़ू पोलिसांनी त्याला केवळ गावातील लोकांनी केलेल्या तोंडी तक्रारीवरच अटक केली. त्याच्यावर असा आरोप होता, की तो एका महिलेसोबत बोलत होता आणि याच कारणामुळे गावातील लोक नाराज होते. पुनीतनं सांगितलं, की मला ठाण्यात घेऊन जाण्यात आलं आणि यानंतर मला मारहाण करण्यात आली तसंच माझे हात-पायही बांधण्यात आले. मला तहान लागल्यानं मी पिण्यासाठी पाणी मागितलं. मला इतकी तहान लागली होती की पाणी न मिळाल्यास माझा जीव जाईल, असं वाटत होतं. मात्र, पोलिसांनी चेतन नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीला माझ्यावर लघूशंका करण्यास सांगितले. पुनीतनं पुढे म्हटलं, की मला ठाण्यातून सोडण्यासाठी त्यांनी फरशीवरील मूत्र चाटण्यास सांगितलं. काहीही पर्याय नसल्यानं मी ते केलं आणि बाहेर आलो. पोलिसांनी मला मारहाण करत दलिस समुदायाला शिवीगाळही केल्याचं त्यानं म्हटलं. चिकमंगलूर जिल्ह्याच्या एसपींनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत संबंधित पोलीस उपनिरिक्षकाविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एसपी म्हणाले, की संबंधित पोलिसाला सध्या दुसऱ्या ठाण्यात ट्रान्सफर केलं गेलं आहे आणि डीवायएसपी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुनीतच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या