JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / उमेदवाराला पोत्यात घालून विहिरीत फेकलं; बाजार समिती निवडणुकीआधीच जुन्नरमध्ये खळबळ

उमेदवाराला पोत्यात घालून विहिरीत फेकलं; बाजार समिती निवडणुकीआधीच जुन्नरमध्ये खळबळ

जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे यांची निघृन हत्या झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

बाजार समिती निवडणुकीआधीच जुन्नरमध्ये खळबळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 7 एप्रिल : नुकत्याच होऊ घातलेल्या जुन्नर बाजार समितीचे उमेदवार व बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांची निघृन हत्या झाली. ही घटना उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तांबे यांना पोत्यात बांधुन विहिरीत फेकले होते. यामुळे या खुनाला राजकिय वळण असल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण? तांबेवाडी बेल्हे येथील किशोर कोंडीभाऊ तांबे (वय 40) हे शेतात जातो असे सांगत निघून गेले होते. ते दिनांक 5 तारखेपासून बेपत्ता होते. दरम्यान ते सापडत नसल्याने नातलगांनी आळेफाटा पोलीसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत ते त्यांच्या दुचाकीसह बेपत्ता असल्याने काही घातपात तर झाला नसावा याबाबत त्या दिशेने पोलीसांनी तपास केला. शेतात रक्ताचे डाग आढळून आलेचे व तिथे काहीतरी झटापट झाल्याची माहिती मिळाली. डॉग स्क्वॉडने कॅनोलपर्यंत माग काढला. परंतु, पुढे माग लागला नाही. आळेफाटा पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी किशोर तांबे यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याची कबुली दिली. पोलीस व स्थानिकांनी आज सकाळी विहिरीतुन किशोर तांबे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तद्नंतर मृतदेह हा आळे येथील प्राथमिक केद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्याचा कसुन तपास चालु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाचा - पत्नीनं कान भरलं अन् आपल्याच आईची केली खांडोळी, धक्कादायक घटनेनं खळबळ जुन्नरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना जुन्नर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, संजय काळे विद्यमान सभापती आहेत. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच विरोध असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने काळे यांची धाकधूक वाढली आहे. तर महाविकास आघाडीत पण फूट पडली असून, शिवसेना (ठाकरे) गट स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने देखील काळे यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. जुन्नर बाजार समितीसाठी 163 अर्ज दाखल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या