कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली. नातेवाईकमंडळी त्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत.
सुशांत सोनी, प्रतिनिधी चतरा, 10 जुलै : आजोबा आणि नातवंडांचं नातं जीवापलीकडचं असतं. या नात्यातला ओलावा काही औरच असतो. झारखंडमध्ये याच प्रेमातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका मद्यधुंद बापाच्या तावडीतून नातवाला वाचवायला गेलेल्या आजोबांनी आपला जीव गमावला. पोटच्या लेकानेच त्यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील तेलियाडीह गावात मुन्नी भुइया (वय - 35 वर्ष) हा मद्यधुंद तरुण दारूच्या नशेत आपल्या मुलाला मारहाण करत होता. काहीच कारण नसताना नातवाला होणारी ही मारहाण आजोबांना पाहवली नाही. त्यामुळे आजोबा काली भुइया हे मध्ये पडले. त्यांच्यात आणि मुन्नीमध्ये झटापट झाली. आधीच नशेत असलेल्या विकृत मुन्नीच्या तळपायातली आग मस्तकात गेली. त्याने मागचा-पुढचा कसलाही विचार न करता घरातला रॉड उचलला आणि वडिलांच्या डोक्यात घातला. वृद्ध वडिलांना हा घाव सोसला नाही, ते प्रचंड तळमळले आणि जागीच कोसळले. वडिलांचा जीव गेल्याचं लक्षात येताच मुन्नीने तिथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तर, दुसरीकडे काली यांच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली. नातेवाईकमंडळी त्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. कोचिंग न घेता दुसऱ्याच प्रयत्नात झाली IPS, आता सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, वाचा, अंशिका वर्माची कहाणी दरम्यान, पोलिसांनी काली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी लेखी तक्रार दाखल झाली असून पूर्ण तपासाअंती आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.