प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 1 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईत एका 43 वर्षांच्या नराधमाने तीन मुलांवर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नक्षीकाम करणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. महिलेच्या सात वर्षांच्या मुलीने तिला झालेला त्रास कथन केल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी त्वरीत तपास करण्याचे आश्वासन दिले आणि जलदगती न्यायालयात जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 43 वर्षीय एम्ब्रॉयडरी कामगार चार, पाच आणि सात वर्षांच्या तीन मुलींना आपल्या घरी घेऊन गेला होता. जेवण देण्याच्या बहाण्याने घरात त्याने या मुलांवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी मुलांना अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्यांच्या ओठांवर चुंबन घेतले. दोन मुलांचे कपडे काढले, त्यांच्यासोबत अश्लिल कृत्य केले. घरी आल्यानंतर मोठ्या मुलाने आईला घटनेची माहिती दिली. आई त्यांना ताबडतोब जेजे मार्ग पोलिस ठाण्यात घेऊन गेली. याप्रकरणी त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे प्रतिबंध (POCSO) कायद्याच्या संबंधित कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक गुन्हा), 354 (आघात किंवा विनयभंगासाठी फौजदारी बळजबरी), 354 (अ) (लैंगिक छळ) आणि 341 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला. रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्… तसेच जेजे मार्ग पोलिसांनी एक पथक तैनात करत 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. “गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याने गुन्हा कबूल केला आहे; आणि पुरावे गोळा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे,”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मिड डे ने याबाबतचे वृत्त दिले आहे. “हा एक गंभीर गुन्हा आहे, आणि आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्ही आमचा तपास 7 दिवसांत पूर्ण करू. या प्रकरणाचा तपास जलदगतीने केला जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करू.”, असेही पोलिसांनी म्हटले आहे.