मुंबई, 2 मे : घाटकोपरमधील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर कॉलनी परिसरात काल मध्यरात्री 20 वर्षीय तरुणाची सहा ते सात जणांनी बेदम मारहाण करीत निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री घडली आहे. विशाल राम कारंडे असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा या विभागातील काही व्यक्तींशी वाद होता. या वादातून काल रात्री 1 वाजताच्या दरम्यान या गटातील सहा ते सात जण त्याच्या घरात घुसले आणि त्याला फरफटत बाहेर काढले. त्याला मारहाण करत दगड, पेव्हर ब्लॉक आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना इथल्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा ही कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. विशाल याचे वडील राम कारंडे यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाराम कारंडे यांनी याच विभागात राहत असलेले आरोपीचे नावे दिल्यावरून मुख्य आरोपी मनोज रनशूर ऊर्फ भावड्या यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा- 22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार यामध्ये किरण निर्भवणे ऊर्फ सोन्या, विवेक मोकल, अजय मोकल, अजय अहिरे, शिवम गवळी, साहिल जाधव यांचा समावेश असून सर्वजणं रमाबाई नगर, घाटकोपर येथे राहणारे असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर दोन ते तीन जणांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी या विभागात सकाळपासून मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेव्हा या मृत तरुणाची अंत्ययात्रा निघाली तेव्हा शेकडोच्या संख्येने स्थानिक त्यात सामील झाले होते, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा मोठा प्रयत्न देखील केला. अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही प्रेत यात्रा स्मशानभूमी पर्यंत गेली. या प्रकरणी सध्या पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.