JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Bank Of Maharashtra शाखेत तब्बल 90 लाखांची हेराफेरी; 5 कर्मचाऱ्यांबाबत मोठा खुलासा 

Bank Of Maharashtra शाखेत तब्बल 90 लाखांची हेराफेरी; 5 कर्मचाऱ्यांबाबत मोठा खुलासा 

बँकेला एका मोठ्या रकमेची आवश्यकता होती. त्यावेळी पैशांची अफरातफर झाल्याचा खुलासा झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 6 जून : मध्यप्रदेशतील (Madhya Pradesh) बैतूल जिल्हा मुख्यालयाजवळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank Of Maharashtra) गंज शाखेत 90 लाखांची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक मॅनेजरच्या तक्रारीनंतर गंज पोलिसांनी बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांवर हेराफेरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मॅनेजरने बँकेत काम करणाऱ्या 5 संशयास्पद कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बँक शाखेच्या करन्सी चेस्टमधून 90 लाख रुपये कमी असल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या शाखेत किती दिवस पैशांची अफरातफर सुरू होती, हे तपासानंतरच समोर येईल. या प्रकरणात संशयांची चौकशी केल्यानंतर 90 लाखांचा घोटाळा उघड होईल. या प्रकरणात आतापर्यंत 5 दोषींची नावं समोर आली आहेत. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.  करन्सी चेस्टमध्ये वेळोवेळी आरबीआय (RBI) आणि संबंधित बँकेकडून पैसे जमा केले जातात. असा झाला खुलासा… 21 मे रोजी बँकेला एका मोठ्या रकमेची आवश्यकता होती. जेव्हा करेन्सी चेस्टमध्ये पैसे घेण्यासाठी गेले तेव्हा तेथे 25 लाख रुपये कमी असल्याचं आढळलं. यानंतर बँक अधिकाऱ्यांनी तपास केला. यानंतर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या करेन्सी चेस्टजवळ सीसीटीव्ही कॅमेरा आणि बायोमेट्रिकदेखील लावलेलं आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या