JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पत्नीच्या मोबाईलमधील चॅटिंग पाहिली, त्याचं डोकंच फिरलं, थेट DNA चाचणी केली आणि...

पत्नीच्या मोबाईलमधील चॅटिंग पाहिली, त्याचं डोकंच फिरलं, थेट DNA चाचणी केली आणि...

पत्नीच्या पहिल्या लग्नाची माहिती पतीला मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

किर्तेश पटेल, प्रतिनिधी सूरत, 11 एप्रिल : सूरतमध्ये एका पतीने पत्नीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. लग्न करताना पत्नीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवल्याचे पतीने न्यायालयात सांगितले. 10 वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना दोन मुले झाली. पण 10 वर्षांनंतर पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण - सुरत येथील एका व्यक्तीचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 10 वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना दोन मुले झाली. कुटुंब सुखी जीवन जगत होते. दरम्यान, पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. यादरम्यान पतीला पत्नीच्या फोनमध्ये अनोळखी लोकांसोबत चॅटिंग दिसली. ते पाहिल्यावर पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे वैवाहिक आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. यादरम्यान पतीला समजले की त्याच्या पत्नीचे एकदा लग्न झाले आहे. आणि तिचे त्याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. पत्नीच्या पहिल्या लग्नाची माहिती पतीला मिळाली. यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. त्याने मुलांची डीएनए चाचणी केली. पण या डीएनए चाचणीमध्ये तिच्या दोन मुलांपैकी एक मुलगा त्याचा नाही आहे. तसेच महिलेच्या पहिल्या पतीपासूनही नाही आहे. तर हे मूल कुणा तिसऱ्याच व्यक्तीपासून झाले आहे, असे अहवालात उघड झाले. या संपूर्ण प्रकरणात पतीने बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. पोलिसांनी पतीची तक्रार घेतली नाही. त्यानंतर पतीने न्यायालयात धाव घेतली आहे. पीडितेच्या पतीच्या वकिलाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलिसांना सीआरपीसी कलम 156 अंतर्गत पत्नीविरुद्ध न्यायालयात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या