JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीने आवडती भाजी केली नाही म्हणून पतीने घेतला टोकाचा निर्णय, रागाच्या भरात....

पत्नीने आवडती भाजी केली नाही म्हणून पतीने घेतला टोकाचा निर्णय, रागाच्या भरात....

महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भीलवाडा, 2 सप्टेंबर : राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील हमीरगड शहरात धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये आढळला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वृद्ध महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. नाथुलाल असे किराणा व्यापारी असलेल्या वृद्ध आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते. खुनाच्या दिवशी पत्नीने पतीच्या आवडीची भाजी तयार केली नाही. यामुळे आरोपी नाथुलालने आपल्या पत्नीची हत्या केली. 16 ऑगस्ट रोजी शहरातील किराणा व्यापारी नाथूलाल सोमाणी आणि त्याची पत्नी प्रेमी देवी सोमाणी यांना कोणीतरी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे नाथलाल जखमी झाला. तर पत्नी प्रेमी देवी गंभीर जखमी झाल्या. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता, अशी माहिती हमीरगड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पुष्पा कसौटिया यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील शेजाऱ्यांची चौकशी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. तसेच संशयितांची आणि मृताच्या मुलापासून पैसे मागणाऱ्या आणि मृताचा पती नाथुलालची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर नथूलालने पत्नी प्रेमदेवी हिचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केला, अशी कबुली पोलिसांना दिली. हा खुलासा झाल्यानंतर नथूलालला अटक करण्यात आली. आरोपीने सांगितले की, त्याची पत्नी प्रेमदेवी दररोज भजन कीर्तनाला जात असे. यादरम्यान ती घराचे गेट बाहेरून बंद करत असे. यानंतर ती रात्री उशिरापर्यंत घरी येत असे. गेट बंद असल्याने नथुलाल कुठेही बाहेर जाऊ शकत नव्हता. तसेच, प्रेमदेवीने त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण त्याला वेळेवर देत नसे. इतकेच नाही तर नातवावरून त्याचे पत्नी प्रेमदेवीशी रोज भांडण व्हायचे. या सततच्या भांडणाला नाथूलाल कंटाळला होता. हेही वाचा -  फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला प्रियकर, नंतर बेशुद्ध करून 70 वर्षाच्या वृद्धासह 5 लोकांचे सामूहिक दुष्कर्म घटनेच्या दिवशीही पती-पत्नीमध्ये भाजीच्या कारणावरून भांडण झाले होते. यादरम्यान प्रेमदेवीने त्याला धक्काबुक्की केल्याने त्याचे रक्त बाहेर आले. याचा नाथुलालला राग आल्याने त्याने बाथरूममध्ये गेलेल्या पत्नीला मागून ढकलले, त्यामुळे ती खाली पडली. यानंतर तिने घातलेल्या साडीच्या पदराने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर बचावासाठी खोलीत जाऊन अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची खोटी कहाणी रचत स्वत:च दरवाजा आतून बंद केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या