नोएडा, 10 ऑगस्ट : अनेक परिवारामध्ये आजकाल पती आणि पत्नी दोन्ही नोकरी करतात. हे शहरी भागात पाहायला मिळतं. मात्र, नोएडा येथे पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे. याप्रकरणी पत्नीच्या खूनानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नोकरीवरून दोघांमध्ये वाद झाला असता पतीने पत्नीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीने खासगी नोकरी करू नये, अशी पतीची इच्छा होती. ही घटना नोएडातील सेक्टर 39 मधील आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. अजय भदोरिया, असे आरोपी पतीचे नाव आहे. अजय भदोरिया हा मूळचा कानपूरचा आहे. तो सेक्टर 39 मधील सालारपूर परिसरात राहत होता. 9 ऑगस्ट रोजी आरोपीने पत्नीची हत्या केली. दोघांमध्ये नोकरीवरून वाद झाला होता. आरोपी पतीला पत्नीने खाजगी नोकरी करावी, असे वाटत नव्हते. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. या वादाचे रुपातंर इतक्या टोकात झाले की, 9 ऑगस्टला आरोपीने पत्नीवर धारदार चाकूने वार केले. तसेच गळा चिरत तिची हत्या केली. हेही वाचा - पत्नीला पाहिल्यावर प्रेयसीच्या बेडमध्ये लपला पती, नंतर घडला फिल्मी ड्रामा, वाचा सविस्तर… तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला याप्रकरणी अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.