JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / जुगार खेळायला, जमिन विकायला पत्नीचा विरोध, दारूड्या पतीने उचललं भयानक पाऊल

जुगार खेळायला, जमिन विकायला पत्नीचा विरोध, दारूड्या पतीने उचललं भयानक पाऊल

मीरा देवी असे मृत महिलेचे नाव आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, प्रतिनिधी बेगूसराय, 27 सप्टेंबर : पती पत्नीचे नाते साता जन्माचे असते, असे म्हटले जाते. मात्र, काही ठिकाणी पत्नी आणि पत्नीमध्ये वाद होऊन टोकाचा निर्णय घेत ते नाते संपुष्टात आणल्याच्याही घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतून बेगुसराय येथे पतीची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे. राम प्रसाद साह असे आरोपीचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  जुगार खेळण्यास आणि जमीन विकण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला विष पाजून ठार मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. मृताच्या कुटुंबीयांसह तिच्या मुलीनेही आपल्या आईची विष देऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे. ही घटना चौराही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एजनी गावातील आहे. चौराही ओपी परिसरातील वॉर्ड क्रमांक 9 एजनी गावात राहणारी मीरा देवी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा मीरा देवीला बेदम मारहाण करत असे. मृत महिलेची कन्या अमृता कुमारीने सांगितले की, आरोपी वडील रामप्रसाद साह याला व्यसनासोबत तो जुगारीही आहे. याचमुळे त्याने 15 कट्ठा जमिनीला विकून टाकले. तसेच त्या पैशांना त्याने दारू आणि जुगारात संपवले. अमृताने असेही सांगितले की त्याने जमिनीच्या नावावर 54 हजार रुपये अॅडव्हान्स घेतला होता.

यानंतर दोन्ही पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. मुलगी आणि भावाने सांगितले की, त्यांची आईचा या सर्व गोष्टींना विरोध होता. सोमवारी सुद्धा पीडितेला आरोपी पतीने दारूच्या नशेत मारहाण केली होती. मात्र, मुले क्लासेसला चालले गेले होते. यानंतर ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची आई उलटी करत आहे. यावेळी याबाबत आरोपी पित्याला सांगितले तर त्याने याकडे दुर्लक्ष केले. यानंतर या महिलेला गंभीर स्थितीतच स्थानिक डॉक्टरांनी बेगुसराय इथे रेफर केले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हेही वाचा -  बेशुद्ध करुन दिला विजेचा शॉक! प्रियकराच्या मदतीने पतीसोबत भयानक कांड घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर घरातील इतर सदस्य फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या