JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / वाद विकोपाला गेला अन् पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, सोबतच घेतली नदीत उडी पण..

वाद विकोपाला गेला अन् पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, सोबतच घेतली नदीत उडी पण..

पती-पत्नीमध्ये काही कारणांवरून भांडण झालं. दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरात ते आत्महत्या करायला निघाले. यानंतर दोघांनी नदीत उडी मारली

जाहिरात

पती-पत्नीची नदीत उडी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 जुलै : पती आणि पत्नीमधील वाद ही सामान्य बाब आहे. मात्र अनेकदा हे वाद इतके विकोपाला जातात की समोरचा व्यक्ती टोकाचं पाऊस उचलतो. हरियाणातील फतेहाबादमध्येही पती-पत्नीमध्ये काही कारणांवरून भांडण झालं. दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरात ते आत्महत्या करायला निघाले. यानंतर दोघांनी नदीत उडी मारली. दोघेही पाण्यात वाहू लागले. यादरम्यान गावातील काही लोकांनी त्यांना पाहिलं आणि वाचवण्यासाठी धाव घेतली. लोकांनी कसंबसं दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसही पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, एकमेकांशी भांडण झाल्यानंतर पती-पत्नीने घग्गर नदीत उडी घेतली. यादरम्यान पूर मदतकार्यात गुंतलेल्या ग्रामस्थांनी दोघंही नदीत वाहून गेल्याचं पाहून तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना नदीतून सुखरूप बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. Shocking News: पहिल्या पत्नीचा तो व्हिडिओ बघत होता पती; दुसऱ्या पत्नीने रागात प्रायव्हेट पार्टच कापला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून कारवाई सुरू केली आहे. पती-पत्नी हे मिराणा गावचे रहिवासी आहेत. या घटनेबाबत रतिया पोलीस स्टेशनचे एसएचओ कुलदीप सिंह यांनी सांगितलं की, बलियाला गावाजवळ पुरुष आणि स्त्री घग्गर नदीत तरंगताना आढळले. गावकऱ्यांनी दोघांनाही नदीतून बाहेर काढून रतिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. गुरसेवक असं नदीत उडी घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून तो मिराणा गावचा रहिवासी आहे. गुरसेवकचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं होतं. यानंतर दोघांनी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांचे जबाब घेत पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या