JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही? कानपुरमधील त्या घटनेचं संपूर्ण सत्य

17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही? कानपुरमधील त्या घटनेचं संपूर्ण सत्य

या 17 महिन्यात विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहावर तब्बल 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं. अंधश्रद्धेच्या अंधारात माणूस हरवला की त्याला वास्तवाचा प्रकाश दिसत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपुर 28 सप्टेंबर : कानपुरच्या रावतपुर येथील इन्कम टॅक्स विभागातील अधिकारी विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहावर 17 महिन्यांपर्यंत कुटुंबीयांकडून उपचार सुरू होता. 23 सप्टेंबर 2022 रोजी या घटनेचा खुलासा झाला. या 17 महिन्यात विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहावर तब्बल 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं. अंधश्रद्धेच्या अंधारात माणूस हरवला की त्याला वास्तवाचा प्रकाश दिसत नाही. अंधश्रद्धेने लोकांना अशाप्रकारे आपल्या कवेत घेतलx आहे की, लोक त्याच्या पकडीतून बाहेर पडू इच्छित नाहीत. हाच प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात घडला. विमलेश सोनकर हे अहमदाबादमध्ये आयकर विभागात काम करत होते. 22 एप्रिल 2021 रोजी कोरोनाच्या लाटेत त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान जून 2021 रोजी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जारी करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र मृतदेह घरी आणल्यानंतर विमलेशच्या कुटुंबीयांना हृदयाचे ठोके सुरू असल्याचं सांगत विमलेशचा अंत्यविधी केला नाही. मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं यानंतर दहा जणांचं संपूर्ण कुटुंब दीड वर्ष अखंडपणे बेडवर पडलेल्या मृतदेहाची काळजी घेत राहिलं आणि इतके दिवस उलटूनही अंतिम संस्कार केले नाहीत. आता तुम्ही विचाराल की दीड वर्षापासून एक मृतदेह घरात पडून होता. अशात घरच्यांना सोडा, पण शेजाऱ्यांनाही याची कल्पना कशी आली नाही. कारण एवढ्या जुन्या प्रेतातून भयंकर दुर्गंध येणं सहाजिक आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात यातील काही प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी विमलेशचा मृतदेह दीड वर्ष पलंगावर ठेवला होता. मग ते एखाद्या जिवंत माणसाप्रमाणेच या मृतदेहाची सेवा करू लागले. घरातील एक मुलगी रोज त्यांच्या नाडीचे ठोके तपासायची आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती कुटुंबीयांना द्यायची. मृतदेहाची सकाळ-संध्याकाळ डेटॉलने स्वच्छता करण्यात यायची. तेलाने मालिश केली जात असे. दररोज कपडे बदलून आणि पलंगावरील कापडही बदललं जात असे. मृतदेह खराब होण्यापासून वाचवण्यासाठी खोलीचा एसी दीड वर्ष सतत चालू होता. Instagram वर प्रेयसी मुलांना फॉलो करत असल्याने होता नाराज; नागपुरातील प्रियकराने उचललं भयानक पाऊल आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारे प्रेत कुजण्यापासून वाचवता येईल का? तर याचं उत्तर बहुधा नाही असंच आहे. मात्र या सगळ्यामुळे मृतदेह कुजण्याऐवजी सुकून ममीसारखा झाला होता. कुजताना शरीरातून पाणी बाहेर पडल्यावर कुटुंबातील सदस्य डेटॉलने ते स्वच्छ करत असल्याचा संशय डॉक्टरांना आहे. तेलाने मृतदेहाची मसाजही केली जात. कदाचित याच कारणामुळे मृतदेहावर बॅक्टेरिया वाढू शकले नाहीत आणि मृतदेहाची दुर्गंधी आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचली नाही. या कुटुंबातील लोक क्वचितच शेजाऱ्यांशी मिसळत असत, पण कोणी विचारल्यावर ते सांगत होते की विमलेश कोमात आहे. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र एवढे गुंतागुंतीचे प्रकरण असतानाही पोलिसांनी शवविच्छेदन का केले नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु कानपूर पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण हत्येचं नसल्यामुळे मृतदेह शवविच्छेदनाशिवाय कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या कानपूर पोलीस प्रशासन विमलेशच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या