JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा अघोरी प्रकार; चहाच्या किटलीपायी गंभीर अवस्थेत लहानगा रुग्णालयात भरती

स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा अघोरी प्रकार; चहाच्या किटलीपायी गंभीर अवस्थेत लहानगा रुग्णालयात भरती

अशा कुप्रथांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, तरीही माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार सातत्याने घडत आहेत.

जाहिरात

एका चहाच्या किटलीसाठी कोणी लहानग्या मुलाला इतकी क्रूर वागणूक कसं देऊ शकतं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 6 ऑगस्ट : पाकिस्तानातून माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका लहानग्याच्या जीभेला गरम लोखंडी सळईने चटका दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. (boy shifted to the Hospital ) मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या आरोपात स्वत: निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी काही लोकांनी त्याच्यासोबत असं कृत्य केलं. (horrible way of proving oneself innocent) पीडित मुलगा जनावरांना फिरवतो व त्यांना चारा खाऊ घालतो. त्याच्यावर चहाची किटली चोरण्याचा आरोप आहे. मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर कारवाई करीत फजाला कच्छ बॉर्डरवर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. (Pakistan crime news) हे ही वाचा- आई चितेवर असताना पतीची संभोगासाठी जबरदस्ती; खचलेली पत्नी कोर्टात म्हणाली… बलोच भागातील जीवघेणी कुप्रथा बलोच समाजात स्वत:च निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अशी कुप्रथा (malpractice) प्रचलित आहे. यामध्ये आरोपीची जीभ जळाली नाबी तर तो निर्दोष असल्याचं सिद्ध होते. मात्र जर त्याची जीभ जळाली तर त्याला चोर सिद्ध केलं जातं. असा कसा न्याय? स्थानिकांनी सांगितलं की, तेथे देशाच्या संविधानाअंतर्गत न्यायव्यवस्था नाही. अशात ते अशा प्रथांचा वापर करून न्यायानिवाडा करतात. या प्रथांमध्ये आरोपीला पाण्यात बुडवणे याचाही समावेश आहे. जर जीवंत राहिली तर ती व्यक्ती निर्दोष मानली जाते. पाकिस्तानात लहान मुलांची सुरक्षा धोक्यात ( Children’s safety is in danger in Pakistan) पाकिस्तानमध्ये लहान मुलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात लैंगिक अत्याचार, अपहरण, बाल विवाह यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 2020 च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये प्रत्येक दिवशी 8 मुलं कोणत्या ना कोणत्या हिंसेचा सामना करतात.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या