प्रातिनिधीक फोटो
रांची, 26 मे : झारखंडमधील (Jharkhand News) एक तरुण आपल्या सासऱ्यांना सोडवण्यासाठी बिहारच्या पोलीस ठाण्यात गेला. यादरम्यान त्याने अशी चूक केली, की त्याचे परिणामा भोगावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अरवल जिल्ह्याच्या करपी पोलीस ठाणे हद्दीच्या कुसरे गावाचे निवासी राम विलास साव यांना मारहाणीच्या आरोपाखील पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्यांना सोडवण्यासाठी झारखंडला राहणारा जावई शनिवारी पोलीस ठाण्यात पोहोचला होता. अतिबोलत असल्याचं पाहून पोलिसांना आला संशय… पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या अटकेमुळे वैतागलेला जावई जयप्रकाश गुप्ता पोलीस ठाण्यात पोहोचली गोंधळ घालू लागला. सासऱ्यांना सोडलं नाही तर रस्ता जाम करण्याची धमकी देऊ लागला. तो नशेत असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी ब्रेथ एनेलाइजर मशीनने त्याची चाचणी केली, तर तो दारू प्यायलेला असल्याचं समोर आलं. यानंतर जावयालाही सासऱ्यासोबत बंद करण्यात आलं. दोघांना शनिवारी न्यायालयीन अटकेत पाठवण्यात आलं. झारखंडमझ्ये दारू बंदी नसली तरी बिहार राज्यात दारू बंदी आहे. त्यात सासऱ्याला सोडवण्यासाठी आलेला जावई दारू पिऊन आल्याचा पोलिसांना संशय आला. तपासाअंती जावई दारू प्यायला असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला सासऱ्यासोबत तुरुंगात जावं लागलं.