Home /News /crime /

'पत्नी नीट साडी ही नेसत नाही', चिठ्ठी लिहित पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

'पत्नी नीट साडी ही नेसत नाही', चिठ्ठी लिहित पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

हा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत नाखुश होता हेच कारण त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा दावा करत, तशी चिठ्ठी लिहित त्याने आत्महत्या केली आहे.

  औरंगाबाद, 18 मे : औरंगाबादमधून (Aurangabad) आत्महत्येची (Suicide) एक घटना समोर आली आहे. एका 24 वर्षाय व्यक्तीने आपल्या घरातच आत्महत्या केली आहे. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. हा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत नाखुश होता हेच कारण त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा दावा करत, तशी चिठ्ठी लिहित त्याने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमधील अधिकारी ब्रम्हा गिरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की या आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याच्या पत्नीला चांगली साडी नेसता येत नाही, ती नीट चालू शकत, तसंच नीट बोलूही शकत नसल्याचं लिहिलं आहे. या व्यक्तीने सहा महिने आधी महिलेशी लग्न केलं होतं. ही महिला सहा वर्ष या व्यक्तीपेक्षा मोठी आहे. सध्या पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोल्हापूरातील एका शाळेच्या अध्यक्षाला अटकेपासून संरक्षण नाकारलं आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाणे गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात गणपतराव पाटील यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली. पाटील यांच्याविरोधात एप्रिल महिन्यात कोल्हापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला फटकारलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केली.

  हे वाचा - काळजाला चटका! ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चार विद्यार्थ्यांचा प्रवास, अपघात झाला अन... 

  उच्च न्यायालयाने सांगितलं, की आरोपीने त्या मुलाला अपमानास्पद रितीने शिवीगाळ केली होती आणि याचाच मुलाला मोठा धक्का बसला होता. मुलाच्या आजोबांनी 2 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांचा नातू सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीत शिकत होता. या शाळेत पाटील अध्यक्ष असून त्यांची पत्नी मुख्याध्यापिका आहे. तक्रारदारानुसार, मुलाची चुकून एका मुलीला टक्कर झाली होती. ती मुलगी जखमी झाल्यानंतर पाटील यांनी मुलाला मारहाण करुन शिवीगाळ केली. त्याला उद्धट तसंच तु कधीही सुधारणार नाही. तु झोपडपट्टीतील मुलगा आहेस अशा भाषेत त्याच्याशी वर्तन केलं गेलं होतं. मुलांना फटकारलं जाऊ शकतं. परंतु पाटील यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह होतं तसंच ते अशा भाषेत बोलू शकत नाही, ज्याने मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aurangabad News, Crime, Suicide, Suicide news

  पुढील बातम्या