लखनऊ 26 जून : नव्या नवरीचे सासरी गेल्यावर भरपूर लाड होतात, असं तुम्ही अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, आता एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच सासरच्या लोकांनी आपलं खरं रूप दाखवलं (Harassment of Newly Married Bride) आहे. महिलेच्या पतीला काहीतरी इतकं खटकलं, की त्यानं नव्या नवरीला आधी दांड्यानं मारहाण केली (Harassment for Dowry) आणि नंतर गरम सळईनं शरीरावर अनेक ठिकाणी चटके दिले. गंभीर अवस्थेत असलेल्या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) बदायूमधील जरीफनगरची आहे. आता पोलीस मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत. पोलिसांनी (UP Police) पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या पती आणि सासूसह कुटुंबातील सात सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी सांगितलं, की उस्मानपूर गावातील सुनीलचं लग्न सहसनाव क्षेत्रातील मुडारी सिधापूर गावातील उर्मिलासोबत 21 जून रोजी झालं होतं. लग्नानंतर नवरी सासरी जाताच सासरकडचे लोक तिचा छळ करू लागले. अखेर CCTV टेक्निशियनचं बिंग फुटलं; Private Video रेकॉर्ड करून करायचा ब्लॅकमेल पीडित उर्मिलाचा असा आरोप आहे, की लग्नाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 24 जून रोजी पती आणि सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. यानंतर तिच्या गुप्तांगावर गरम सळईनं चटके दिले गेले. यानंतर सासरकडच्या लोकांनी तिचे हातपाय बांधून अमानुष पद्धतीनं तिच्या गुप्तांगावर वार केले. तिच्या प्रायव्हेट पार्टला सात टाके लावावे लागले आहेत. लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये घुसून मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ; भाईंदरमधील घटना पोलिसांनी सांगितलं, की पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली असून सासरकडच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. नवविवाहितेला मेडिकलसाठी महिला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलीस सध्या मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात एफआयआर दाखल करून घेतली आहे, तसंच पीडितेच्या पतीला अटक केली आहे.