अनैतिक संबंधात अडसर
गुरुग्राम, 27 जून : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. 3 मुलांची आई असलेली आरोपी महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने स्वतःच्या पतीला संपवलं. बादशाहपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी टेलरच्या हत्येप्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींनी मिळून 26 जूनला दुपारी मधुसूदनची हत्या केली. गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोघांनी घरातीन सामान अस्ताव्यस्त केले. जेणेकरून कोणीतरी लुटण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केला आहे असे पोलिसांना वाटेल. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता संशयाची सुई मृताच्या पत्नीकडे फिरली. यानंतर पोलिसांनी एकएक धागा शोधत मृताच्या पत्नीची कडक चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. पतीसोबतच्या घरगुती वादामुळे ती त्रस्त होती, त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे तिने प्राथमिक चौकशीत सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. आरोपी एकाच शाळेत शिक्षक दोघेही बादशाहपूर येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. इथे दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी मधुसूदनला वाटेवरून हटवण्याचा कट रचला. 26 जून रोजी मधुसूदन घरी एकटाच असताना त्याच्या पत्नीने छत्रीत लपवलेले हत्यार घेऊन आलेल्या प्रियकराला बोलावून आधी मधुसूदनच्या डोक्यात वार केले आणि नंतर गळा चिरून त्याचा खून केला. गुन्ह्यात पकडले जाऊ नये म्हणून दोघांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकले. जेणेकरून कोणीतरी लुटण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना वाटेल. वाचा - प्रेमसंबंधास नकार, विवाहितेने बॉयफ्रेंडला पुण्यातून केलं किडनॅप, गुजरातला हॉटेलवर नेऊन.. एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितले की, सध्या पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. येथून आरोपींची रिमांडवर चौकशी केली जाणार आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.