JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लव्ह जिहाद कायदा लागू होताच तीन दिवसांत पहिला गुन्हा दाखल; आरोपी अटकेत

लव्ह जिहाद कायदा लागू होताच तीन दिवसांत पहिला गुन्हा दाखल; आरोपी अटकेत

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही लव्ह जिहाद कायदा (Love Jihad Act) लागू झाला आहे. 15 जून रोजी गुजरातमध्ये (Gujarat) हा कायदा लागू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गांधीनगर, 19 जून: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही लव्ह जिहाद कायदा (Love Jihad Act) लागू झाला आहे. 15 जून रोजी गुजरातमध्ये (Gujarat) हा कायदा लागू झाल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच त्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधल्या बडोद्यातल्या (Vadodara) तरसाली भागातल्या एका 25 वर्षीय मुस्लिम (Muslim) तरुणाने ख्रिश्चन (Christian) असल्याचं भासवून एका 25 वर्षीय हिंदू (Hindu) तरुणीशी विवाह केला. सत्य परिस्थिती कळल्यावर संबंधित हिंदू तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम 2021’ अर्थात लव्ह जिहाद कायद्याच्या उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ‘झी-न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. बडोद्याच्या गोत्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक एस. व्ही. चौधरी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. हिंदू तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे, की समीर अब्दुलभाई कुरेशी नावाच्या एका तरुणाने इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून तिच्याशी मैत्री केली. त्याने आपलं नाव सॅम मार्टिन असल्याचं सांगून आपण ख्रिश्चन असल्याचं भासवलं. त्यानंतर त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तसंच, त्यांच्यातल्या त्या खासगी क्षणांचे फोटो त्याने टिपले. ते फोटो दाखवून त्या तरुणाने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्याशी विवाह केला नाही, तर फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर 2019 साली दोघांनी विवाह केला. विवाहानंतर संबंधित तरुणीला सॅम मार्टिन हा समीर अब्दुलभाई कुरेशी असल्याचं कळलं. त्यानंतर संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम 2021’नुसार भारतीय दंडविधान कलम 376, 377, 504, 506 (2) आणि खंड (4)च्या अनुसार एका आरोपीला अटक केली आहे. बडोद्याचे डीसीपी जयराजसिंह वाला यांनी याबद्दलची माहिती दिली. हेही वाचा-  मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीबाबत मुंबई काँग्रेसची भूमिका स्पष्ट लव्ह जिहाद कायदा अगोदर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्याने लागू केला होता. त्या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुजरातमध्येही (Gujarat Freedom of Religion (Amendment) Act 2021) हा कायदा एक एप्रिल रोजी विधानसभेत पारित झाला होता. महिन्याभरापूर्वीच गुजरातच्या राज्यपालांची त्यावर स्वाक्षरी झाली आणि 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू करण्यात आला होता. कायदा लागू झाल्या झाल्या तीन-चार दिवसांतच पहिला गुन्हा दाखल झाला आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या