लग्नानंतर 10 दिवसातच नवरीने दिला बाळाला जन्म (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ 07 जून : लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांत एका नवविवाहित महिलेने मुलाला जन्म दिला. यानंतर नवविवाहित महिलेसोबत राहण्यास तिच्या पती आणि सासरच्यांनी नकार दिला. दुसरीकडे, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गँगरेप आणि एससी-एसटीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागातून समोर आलं आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. हे प्रकरण कानपूरच्या रुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका दलित मुलीचा 15 मे 2023 रोजी भोगनीपूर परिसरातील गावात विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर 25 मे रोजी नवविवाहित महिला माहेरी आली असता तिला पोटात दुखू लागलं. लग्नाच्या तीन वर्षांपर्यंत झालं नाही मूल, देवाकडे नवस मागितला, आता महिलेने तीन मुलांना दिला जन्म नातेवाइकांनी तिला अकबरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, तिथे प्रसूतीच्या वेदनांदरम्यान तिने 26 मे रोजी एका मुलीला जन्म दिला. बाळ अतिशय अशक्त असल्याने अल्पावधीतच त्याचा मृत्यू झाला. ही बाब पती आणि सासरच्या मंडळींना समजल्यावर त्यांनी महिलेला आपल्या घरी नेण्यास आणि नांदवण्यास नकार दिला. ही बाब परिसरात समजल्यानंतर पीडितेने 6 जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गावातील अरुण पाल आणि विनय पाल यांच्यावर जबरदस्तीने बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक समर बहादूर सिंग यांनी सांगितलं की, अरुण पाल आणि विनय पाल यांच्याविरुद्ध 374-डी, 506 आणि 3(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.