नवरदेवावर फुलांऐवजी दगडांचा मारा (प्रतिकात्मक फोटो)
रायपूर 10 जून : लग्नाच्या दिवशी आपलं आनंदाने मंडपात स्वागत व्हावं, अशी जवळपास प्रत्येक नवरदेवाची इच्छा असते. मात्र आता एका नवरदेवासोबत घडलेली अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील पेंड्रा येथून कोल कुटुंबाची वरात आली होती. रात्री उशिरा लग्नाची वरात याठिकाणी पोहोचली असता स्थानिक लोकांचा वऱ्हाड्यांसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर जोरदार हाणामारी झाली. वरातीत आलेल्या लोकांना गावातील महिलांसह रमेश कोल, गोलू कोल, दिनेश कोल आणि श्रावण केवट यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. एवढंच नाही तर दारूच्या नशेत असलेल्या तरुणांना नवरदेवाचा इतका राग आला की त्यांनी दगडाने त्याची गाडी फोडली. गाडीची विंडशील्ड तुटली आणि वराच्या कुटुंबीयांच्या डोक्यात लाठ्या आणि दगडाने वार करण्यात आले. यात अनेक जण गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी 100 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच अमलाई पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गाडीसह जखमींना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. रात्री उशिरापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. ज्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती तेही जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात बसले होते. 3 लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, त्यानेही फसवलं मग पोलीस स्टेशन गाठलं दुसरीकडे, सकाळी पुन्हा एकदा वाद अधिक वाढला. मात्र, यादरम्यान लग्नाचा कार्यक्रम पार पडला. परंतु तथाकथित तरुणांनी खुलं आव्हान देत म्हटलं, की इथून नवरी-नवरदेव आणि वरात नाही तर आता त्यांचे मृतदेह जातील. घाबरलेल्या वऱ्हाडींनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. या सगळ्यात व्हिडिओ कॉलवर वधू-वरांनी आपली व्यथा मांडली आणि आम्हाला इथून सुखरूप बाहेर काढलं पाहिजे, असं सांगितलं. आम्ही दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शांतता असून वरातीतील लोक भयभीत झाले आहेत.