JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Gondiya News : गोंदियातील धक्कादायक घटना रक्ताच्या थारोळ्यात सापडले आई अन् मुलगा

Gondiya News : गोंदियातील धक्कादायक घटना रक्ताच्या थारोळ्यात सापडले आई अन् मुलगा

Gondiya News : आई आणि मुलावर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला, हल्ल्यात आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु.

जाहिरात

गोंदियातील धक्कादायक प्रकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी सपाटे, गोंदिया : आई आणि मुलावर अज्ञान व्यक्तीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यातआईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्रीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली. इथे राहणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या मुलावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संध्या महेंद्र कोरे (४८) रा. चंद्रशेखर वॉर्ड,नश्रीनगर गोंदिया असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे.

तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव करण असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्यावर गोंदियातील के.टी.एस. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भूक लागली म्हणून ऑनलाइन ऑर्डर केली, पार्सल घ्यायला दार उघडलं आणि….

महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने ५ ते ६ घाव केल्याने खूप रक्तस्त्राव झाला आणि महिलेनं प्राण सोडले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी मुलाला उपचाराकरिता रवाना केले.

Kandivali crime : पत्नीशी अनैतिसंबंध असल्याचा लागला सुगावा; तरुणाचे मित्रासोबत धक्कादायक कृत्य

संबंधित बातम्या

प्रकरण नेमकं काय हे मुलगा सांगू शकेल पण त्यावर सध्या उपचार सुरू असल्यामुळे त्याचा जबाब घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली असल्याचे शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बुधवारी दुपारी पोलिसांनी परत एकदा घटना स्थळी जाऊन पुन्हा चौकशी केली. अद्याप अंतिम निष्कर्ष पर्यंत पोहचले नाही. प्रकरणाचा तपास गोंदिया शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या