रेल्वे स्टेशनबाहेरच तरुणीचा विनयभंग
ठाणे, 14 ऑक्टोबर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात. राज्यातील महिला कितपत सुरक्षित आहेत हा खरंतर प्रश्नचिन्हच आहे. कारण वारंवार महिला आणि मुलींच्या विनयभंग, अत्याचार आणि छळाच्या बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई, उपराजधानी नागपूरपासून ते अनेक मोठ्यामोठ्या शहरांपासून खेडेगावांपर्यंत या घटना घडत आहेत. आतादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. ठाण्यात एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. विशेष रेल्वे स्टेशन परिसरात याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिसांता धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
( तरूणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारं सेक्स्टॉर्शन असतं काय? पुण्यात घडले हजारो प्रकार ) नेमकं काय घडलं? तरुणाने अश्लिल शेरेबाजी केली. त्याचा जाब विचारायला मुलगी गेली असता त्याने आणखी अश्लिल वर्तन केले. यामुळे तरुणीने त्याची कॅालर पकडली. तोच रिक्षावाल्याने रिक्षा पळवली आणि मुलीला फरपटत नेले. मुलगी रस्तावर पडली आणि तिला दुखापत झाली. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. विकृत तरुणाने तरुणीला फरफटत नेल्याने ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी तरुण हा पळून गेला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी तरुणीला रस्त्यावरुन उठवलं आणि तिची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना आरोपी रिक्षाचालकाला देखील पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पोलीस याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.