JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण, नंतर अनेक वेश्यालयात विकलं; सामूहिक बलात्कार प्रकरणी 80 जण ताब्यात

13 वर्षाच्या मुलीचं अपहरण, नंतर अनेक वेश्यालयात विकलं; सामूहिक बलात्कार प्रकरणी 80 जण ताब्यात

आंध्रप्रदेशच्या गुंटूर (Guntur Andhra Pradesh) जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape on Minor) करण्यात आला. तर या मुलीचे अपहरण करुन तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुंटूर, 8 मे : आंध्रप्रदेशच्या गुंटूर (Guntur Andhra Pradesh) जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape on Minor) करण्यात आला. या मुलीचे अपहरण करुन तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले होते. यानंतर आठ महिन्यात अनेक जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी पीडित मुलीला 19 एप्रिल रोजी या जाळ्यातून बाहेर काढले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 80 जणांना आरोपी बनविले आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पीडितेच्या आईची सवर्णा कुमारी नावाच्या महिलेसोबत कोरोनाकाळात एका रुग्णालयात जून 2021 मध्ये भेट झाली होती. काही काळानंतर पीडितेच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर सवर्णा नावाची ही महिला या पीडितेला घेऊन गेली. तसेच तिने याबाबत मुलीच्या वडिलांना काहीच माहिती दिली नाही. 8 महिन्यांत अनेक वेश्यालयात विकले ऑगस्ट 2021 मध्ये पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सवर्णा कुमारीला मुख्य आरोपी बनवले. याप्रकरणी पहिली अटक जानेवारी महिन्यात झाली होती. यानंतर 19 एप्रिल रोजी पोलिसांनी आणखी 10 जणांना अटक केली. त्याच दिवशी पीडितेची सुटका करण्यात आली. पीडितेने पोलिसांना आपबीती कथन केली. तिने सांगितले की, मागील आठ महिन्यात तिला तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील अनेक वेश्यालयात विकण्यात आले. तिच्याकडून इथे वेश्या व्यवसाय करुन घेण्यात आला. तिच्यावर अनेक बलात्कार तसेच सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुंटूरच्या एएसपी सुप्रजा यांनी सांगितले की, पोलिसांनी 80 आरोपींना ओळखले असून शोध घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात येत आहे. त्यापैकी काही वेश्यागृहांचे संचालक आहेत, 35 पिंपल्स आहेत आणि उर्वरित ग्राहक आहेत, असेही त्यांनी सांगितले.  हेही वाचा -  आंतरजातीय विवाहानंतर घरच्यांनी फरफटत माहेरी नेलं; पतीच्या हाकेनंतर मदतीसाठी धावून आले पोलीस

मुलीच्या वयाचा आणि परिस्थितीचा फायदा घेतला. अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर लैंगिक कामासाठी दबाव टाकला. या प्रकरणातील एक आरोपी लंडनमध्ये आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एक कार, 53 मोबाईल, तीन ऑटो आणि दुचाकी जप्त केल्या आहेत. विजयवाडा, हैदराबाद, काकीनाडा आणि नेलारू येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या