आरोपी मोहसिन
भंवरकुआ, 21 फेब्रुवारी : देशात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर महिलांशी ओळख करुन गोड बोलून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आरोपी हा महिलांशी मैत्री करायचा आणि लग्न करतो, असे आश्वासन द्यायचा. त्याने आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर लाखो रुपयांना गंडा घातला. त्याने खूप महिलांची फसवणूक केली आहे, अशी कबुली आरोपीने दिली आहे. अटकेनंतर पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहे. याप्रकरणी केरळ राज्यातील रहिवाशी श्रीनिवास राव यांनी तक्रार दाखल केली होती. भंवरकुआ पोलीस ठाण्याचे चौकशी अधिकारी आनंद रॉय यांनी सांगितले की, तक्रारदार श्रीनिवास राव यांच्या पत्नी बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली की, महिलेच्या खात्यातून दिल्लीला पैसे पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर मोबाईल लोकेशन पोलिसांनी शोधायला सुरुवात केली असता बेपत्ता झालेल्या महिलेचे बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहसिन समोर आले. हेही वाचा - आफताफपेक्षाही किळसवाणं कृत्य, 6 वर्ष लिव्ह इनमध्ये; शेवटी आगीत दिलं झोकून यानंतर पोलिसांनी मोहसिनला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता धक्कादायक प्रकार समोर आला. त्याची चौकशी केली असता तो बंगालमध्ये असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे अनेक महिलांचे मोबाईल नंबर सापडले. काही महिलांनी त्याच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याचे पोलिसांना समजले. महिलांशी गोड बोलून तो लाखो रुपयांना गंडा घालायचा. आरोपी दिल्लीतील एका महिलेला भेटलाही आहे. तो प्रत्येकवेळी सोशल मीडियावर आपलं नाव बदलून मैत्री करायचा. मध्य प्रदेशातील भंवरकुआ पोलिसांनी दिल्लीतून या आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.