JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Instagramवर चॅटिंगनंतर दीड वर्ष चाललं प्रेमप्रकरण, Valentines Weekमध्ये प्रियकरासोबत घडलं भयानक

Instagramवर चॅटिंगनंतर दीड वर्ष चाललं प्रेमप्रकरण, Valentines Weekमध्ये प्रियकरासोबत घडलं भयानक

सध्या प्रेम सप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. याचदरम्यान, एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरठ, 12 फेब्रुवारी : सध्या प्रेम सप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. लव्हबर्ड्स एकमेकांसोबत ‘लव्ह वीक’ साजरा करत आहेत. तर सिंगल सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करून हा आठवडा साजरा करत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काय आहे नेमकी घटना - व्हॅलेंटाइन वीकदरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका प्रियकराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. खोट्या अभिमानासाठी प्रेयसीच्या भावांनी सरे मार्केटमध्ये तरुणावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासात प्रेयसी तरुणीने आपल्या भावांच्या कृत्याची माहिती दिली. सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना मेरठच्या लिसाडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. इथे सरे बाजार मेडिकल स्टोअर ऑपरेटरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी करून मयताचा मोबाईल शोधला असता, त्याच्या प्रेयसीची माहिती मिळाली. प्रेयसीने सांगितले सत्य - हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाजवळ एक फोन सापडला. पोलिसांनी तपास केला असता प्रेमप्रकरणाचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा या प्रेयसीने सांगितले की, तिचे नाव आयशा असून तिचे साजिद नावाच्या मुलावर प्रेम होते. दोघांची भेट इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली. दीड वर्ष दोघांमधील प्रेमसंबंध सुरू होते. हेही वाचा -  फोनवर बोलल्याने प्रेयसीच्या घरच्यांचा राग अनावर, प्रियकराला घरातून बोलावले आणि… एकाला अटक तर दोन फरार - आयशाच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. यानंतर आयेशाच्या भावांनी आधी आयशाला मारहाण केली, त्यानंतर मित्रासोबत मिळून साजिदची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणी पुरावे गोळा करत आहेत. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. सध्या प्रेम सप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. याचदरम्यान, प्रियकराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या