JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नवस केल्यानंतर घरात पाळणा हलला; जन्माच्या 5 दिवसांत बाळाचा रस्त्यातच मृत्यू

नवस केल्यानंतर घरात पाळणा हलला; जन्माच्या 5 दिवसांत बाळाचा रस्त्यातच मृत्यू

नवजात बाळाला घेऊन आई-वडील रुग्णालयात निघाले होते.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपुर, 19 मे : जयपुरमधील (Jaipur News) सांगानेर येथील जयपुरमधून मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या 5 दिवसाच्या बाळाचा रस्ते अपघातात दुर्देवाने मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील हाडं पूर्णपणे तयार झाली नव्हती. मात्र तरीही त्याच्या शरीरात 12 हून अधिक फ्रॅक्चर झाले. यात त्याचं डोक्याच्या हाडांचा भूगा झाला. नवजात बाळ आपल्या आई-वडिलांसह रुग्णालयात जाण्यासाठी बाईकवरुन निघाले होते. बाळाची आई मागे बसली होती. आणि बाळ आईच्या कुशीत होती. यादरम्यान अनियंत्रित कारने बाइकला धडक दिली. अनियंत्रित झालेल्या कारने बाइकला मागून धडक दिली… जयपुरच्या मुहाना पोलीस ठाण्याची टीम गस्तीवर होती. यादरम्यान मंगलम सिटी अपार्टमेंट्सजवळून अर्जुन बाहेर निघाले. अर्जुनची पत्नी अमृता बाइकच्या मागे 5 दिवसांच्या बाळाला घेऊन बसली होती. बाळ आजारी होतं आणि आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी निघाले होते. यादरम्यान एका जलद गतीने येणाऱ्या कारने बाईकला धडक दिली. अपघात करणारा तरुण इतका क्रूर होता की, बाइकला धडक दिल्यानंतर कार चालक पळून गेला. पीडित पती-पत्नी आरडाओरडा करीत होते. काही वेळानंतर पोलिसांना याबाबत कळालं आणि ते घटनास्थळी पोहोचले. यानंतर कार चालकाला अटक करण्यात आली. यादरम्यान बाळ रस्त्यावर पडलं होतं. काही वेळापूर्वी रडणारं बाळ अचानक शांत झालं. बाळ बेशुद्ध झाल्याचं पाहून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, बरेच नवस केल्यानंतर आम्हाला मूल झालं होतं. डिलिव्हरीदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले होते. यानंतर कुठे मूल आणि पत्नी सुरक्षित होते. मात्र जन्माच्या 5  दिवसात मूल सोडून गेला. या घटनेनंतर अर्जुनच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या