JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आधी बलात्कार, मग अश्लील व्हिडीओ; 3 मित्रांसोबत शेअर केल्यानंतर सुरू झाला थरकाप उडवणारा प्रकार

आधी बलात्कार, मग अश्लील व्हिडीओ; 3 मित्रांसोबत शेअर केल्यानंतर सुरू झाला थरकाप उडवणारा प्रकार

हे तीन मित्रही तरुणीला ब्लॅकमेल करीत तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बलात्कार करीत राहिली.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 28 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) अलवरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. दररोज दूध घेण्यासाठी येणाऱ्या गावातील एका तरुणाने एकेदिवशी संधी साधत महिलेसोबत बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला. इतकच नाही तर या तरुणाने तिचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला. हा व्हिडीओ त्याने आणखी 3 मित्रांसोबत शेअर केला. ही तिघे तरुण महिलेला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेक करू लागले. यानंतर महिलेला एका हॉटेलमध्ये नेत चौघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. हे इतक्यावरच थांबलं नाही तर जेव्हा तरुणांची इच्छा होत ते महिलेला हॉटेलमध्ये नेत आणि तिच्यावर बलात्कार करीत. हॉटेलमधील आयडीच्या नावावर तरुण आपल्या पत्नीचे आयडी दाखवित होते. महिलेचा पती दुसऱ्या शहरात काम करतो. तो घरी आल्यानंतर पत्नीला तणावात पाहून त्याने कारण विचारलं. यानंतर महिलेने पतीला सर्व घटनाक्रम सांगितला. महिलेने 15 जानेवारी रोजी पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे ही वाचा- मशिदीतल्या इमामानं 8 वर्षांच्या मुलीला दिल्या नरकयातना, नंतर दिली कुराणाची शपथ दूध घेण्यासाठी येत होता तरुण… महिलेचा (30) पती एका खासगी कंपनीत नोकरी करतो. गावात सासू-सासरे आणि दोन मुलं राहतात. घरात गाय-म्हशी असल्यामुळे गावकरी दूध घेण्यासाठी घरी येतात. गावालीत एक तरुण दूध घेण्यासाठी घरी येत होता. डिसेंबरमध्ये आरोपीने महिलेवर बलात्कार करीत तिचा व्हिडीओ शूट केला. बलात्कारानंतर त्याने हा व्हिडीओ आपल्या 3 मित्रांसोबत शेअर केला. यानंतर तिघांनीही महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. व्हिडीओ दाखवून चौघांनीही पीडितेसोबत बलात्कार केला. समोर आलेल्या वृत्तानुसार, आरोपी पीडितेवर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत बलात्कार करीत होते. आरोपी हॉटेलमध्ये आपल्या पत्नीचा आयकार्ड दाखवून पीडितेला पत्नी असल्याचं सांगायले. पीडितेने सांगितलं की, 15 जानेवारीला हा प्रकार समोर आला. मात्र पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही. यानंतर पीडिता आणि तिचा पती एसपीकडे गेले आहेत. यानंतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, याचे नाव दिनेश आहे. त्याशिवाय समुद्र सिंह, श्याम सिंह आणि गिर्राज या तिघांना अद्याप अटक केलेली नाही. हे लोक दररोज घरी येऊन धमकी देत आहेत.  इतकच नाही तर आरोपी महिलेला जीवे मारण्याची धमकी देत आहेत.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या