प्रातिनिधीक फोटो
कलकत्ता, 12 ऑगस्ट : पश्चिम बंगालमधील हावडामध्ये राखीपौर्णिमेच्या पुजावरुन झालेल्या वादात घरातील सदस्यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्वांना एक एक करून कटरने मारण्यात आलं. ही घटना एमसी घोष लेन पोलीस ठाणे हद्दीतील आहे. बुधवारी ही घटना घडली. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेने सासू, मोठा दीर, जाऊ आणि पुतणीची हत्या केली. आरोपी महिलेच्या पतीवरही संशय आहे. मात्र तो सध्या फरार आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री साधारण 10.30 वाजता घरात राखीपौर्णिमा साजरी करण्यावरुन वाद झाला. वाद तेव्हा वाढला, जेव्हा पल्लवी घोषने पाहिलं की, तळमजल्यावर टॉयटेलमध्ये एक नळ सुरू आहे आणि पाणी वाया जात आहे. यावर पल्लवीने आपल्या सासूकडे तक्रार केली की, पाणी वाया गेल्यामुळे घरात नेहमी गोंधळ होतो. Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झालाआणि रागाच्या भरात पल्लवीने कटर उचललं आणि सर्वात आधी आपली सासू माधवीवर (58) हल्ला केला. यादरम्यान वाचवण्यासाठी आलेला मोठा दीर देवाशीष (36) , त्याची पत्नी रेखा (31) आणि 13 वर्षीय पुतणीवर पल्लवीने कटरने हल्ला केला. चौघांचे मान, खांदा, आणि हातावर ठिकठिकाणी जखमा केला. यात चौघांचा मृत्यू झाला. सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी पल्लवीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत पल्लवीने चौघांची हत्या केल्याचं स्वीकारलं आहे. तिने सांगितलं की, ती दिवसभर औषध घेते. पोलिसांचं म्हणणं आहे की, महिलेबाबत डॉक्टरांसोबत चर्चा केली जात आहे. महिला मानसिक आजाराचा सामना करीत आहे. महिलेने पोलिसांना पुढे सांगितलं की, अनेकदा त्यांचं भांडणं होत होतं.