JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आधी मटण खाऊ घातलं, दारू पाजली; राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली

आधी मटण खाऊ घातलं, दारू पाजली; राजेश्वरने मित्राकडून अशी केली वसुली

शेवटी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय/ ठाणे, 8 ऑक्टोबर : ठाण्यातील कल्याण तिसगाव भागातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कर्जाऊ दिलेल्या पैसे परत न केल्याने एका तरुणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत: फोन करून पोलिसांना सांगितलं की, मी माझ्या मित्राची हत्या केली आहे. आरोपीचं नाव राजेश्वर पांडे आणि मृत व्यक्तीचं नाव बिपिन दुबे आहे. कल्याणच्या कोळशेवाडी भागात राहणाऱ्या राजेश्वर पांडे आणि बिपिन दुबे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, याशिवाय त्यांच्याच चांगली मैत्री होती. काही दिवसांपूर्वी राजेश्वर पांडेकडून बिपिनने कर्जाऊ पैसे मागितले होते. यानंतर राजेश्वरने अनेकदा बिपिनकडून पैसे मागितले. मात्र अनेकदा बिपिनने इथलं तिथलं कारण सांगत पैसे देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद सुरू झाले. आज दुपारी राजेश्वर पांडेने बिपिन दुबेला आपल्या घरी बोलावलं. मटण आणि दारू पार्टी केली. यानंतर राजेश्वरने बिपिनकडून पैशांची मागणी केली. मात्र नशेत असतानाही बिपिनने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे राजेश्वर नाराज झाला आणि मटण कापण्याच्या सुऱ्याने बिपिनवर हल्ला केला. या हल्ल्यात बिपिन गंभीर जखमी झाला. घरात सर्वत्र रक्त पसरलं होतं. काही वेळात बिपिनचा मृत्यू झाला. प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने घेतला बदला; आधी स्वतःच्या अपहरणाचा बनाव मग मुंबईतील तरुणाचं धक्कादायक कृत्य यानंतर राजेश्वरने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात फोन करून सांगितलं की, मी माझ्या मित्राची हत्या केली आहे. यानंतर पोसीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या