सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना ठाण्यातील घंटाळी मैदानात गोळीबाराची घटना घडली आहे.
ठाणे, 21 ऑक्टोबर : ठाण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना ठाण्यातील घंटाळी मैदानात गोळीबाराची घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घंडाळी मैदानामध्ये दोन गटामध्ये वाद सुरू होता. यावेळी भांडण सोडवण्यासाठी एका व्यक्ती प्रयत्न केला. पण, अज्ञात तरुणाने या व्यक्तीवरच गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे ही व्यक्ती जखमी झाली आहे. (नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल) जखमी अवस्थेत तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. गोळीबार का आणि कुणी केला याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, गेल्या 20 दिवसात ठाण्यात गोळीबारच्या घटना वाढल्या आहे. वाशिम शहरात गाद्या विकणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीचा खून दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील पुसद महामार्गावर धक्कादायक घटना समोर आली आहे. लोटांगने महाराज मंदिरा जवळ रात्री गाद्या विकणाऱ्या उत्तरप्रदेशमधील व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. ओमप्रकाश चव्हाण असं मृतकाचे नाव आहे. हा व्यक्ती उत्तरप्रदेशमधील खोरीया शिव येथील रहिवाशी होता.ओमप्रकाश चव्हाण आणि त्याचे सहकारी गाद्या विकून आल्यावर रात्री झोपले होते. ( डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक ) त्यावेळी एका अज्ञात व्यक्तींनी येऊन ओमप्रकाश चव्हाणवर चाकूने वार करून त्याचा खून केला. ओमप्रकाश चव्हाणच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून दिवाळीच्या तोंडावर खुनाची घटना घडल्याने वाशिम शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचा तपास वाशिम पोलीस करत आहेत.